महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज.! ठाणे आणि भिवंडीतून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसं असणार संपूर्ण वेळापत्रक ? वाचा….

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी ऐन उन्हाळ्यात रेल्वे प्रशासनाकडून एक मोठी भेट देण्यात आली आहे. ठाणे आणि भिवंडी वरून उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर समर स्पेशल ट्रेन चालवण्याची मोठी घोषणा मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

Published on -

Maharashtra Railway News : एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा उलटला आणि तापमानाने एक नवीन विक्रम सेट केला. तापमान वाढीमुळे सध्या सर्वत्र उकाडा जाणवत असून यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय. दरम्यान तापमान वाढीमुळे त्रस्त झालेल्या रेल्वे प्रवाशांसाठी प्रशासनाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

सध्या देशात उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्या आहेत आणि उन्हाळी सुट्ट्यांमुळे अनेकजण आपल्या मूळ गावाला जात आहेत. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात अनेक जण आपल्या मूळ गावाकडे जातात. काही लोक आपल्याला नातलगांकडे जातात तर काही लोक पिकनिक साठी ही बाहेर पडत असतात.

यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या या काळात उल्लेखनीय वाढते. दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमधील गर्दीच्या काळात अनेकांना रेल्वेमध्ये कन्फर्म तिकीट मिळत नाही. दरम्यान उन्हाळी सुट्ट्यांमध्ये होणारी रेल्वे प्रवाशांची ही अतिरिक्त गर्दी लक्षात घेता आता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ठाणे आणि भिवंडी येथून विशेष गाड्या चालवण्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून भिवंडी – सांकराईल आणि ठाणे – खडगपूर यादरम्यान समर स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक कसे आहे आणि या गाड्या कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं असणार भिवंडी – सांकराईल समर स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक?

सेंट्रल रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, भिवंडी – सांकराईल समर स्पेशल ट्रेन (गाडी क्रमांक 01149) अनारक्षित विशेष रेल्वेगाडी 9 एप्रिल ते 23 एप्रिल 2025 या काळात चालवली जाणार आहे.

या काळात ही गाडी दर बुधवारी भिवंडी येथून रात्री साडेदहा वाजता सोडली जाणार आहे आणि आपल्या गंतव्यस्थानी म्हणजेच सांकराईल माल टर्मिनल यार्ड येथे तिसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजता पोहोचणार आहे.

भिवंडी – सांकराईल रेल्वे गाडीला कोणकोणत्या स्थानकावर थांबा मिळणार?

या विशेष रेल्वे गाडीला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्याचा निर्णय सेंट्रल रेल्वेने घेतलेला आहे. ही गाडी या मार्गावरील कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, रायपुर, बिलासपुर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपुर, टाटानगर आणि खडगपुर येथे थांबा घेणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

ठाणे – खडगपूर अनारक्षित साप्ताहिक ट्रेनचे वेळापत्रक कसे राहणार?

ठाणे – खडगपूर अनारक्षित साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी 12 एप्रिल ते 26 एप्रिल 2025 दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात या विशेष गाडीच्या तीन फेऱ्या चालवण्याचे नियोजन आहे.

ही स्पेशल गाडी म्हणजेच गाडी क्रमांक 01150 अनारक्षित विशेष रेल्वेगाडी या काळात दर शनिवारी खडगपूर येथून रात्री पावणे बारा वाजता सोडली जाणार आहे आणि ठाणे येथे तिसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता ही स्पेशल ट्रेन पोहोचणार आहे.

ठाणे – खडगपूर समर स्पेशल ट्रेन कोण कोणत्या स्थानकावर थांबणार?

या समर स्पेशल ट्रेनला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्याचा निर्णय झालाय. ही रेल्वेगाडी या मार्गावरील टाटानगर, चक्रधरपुर, राउरकेला, झारसुगुडा, बिलासपुर,

रायपुर, गोंदिया, नागपूर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी आणि कल्याण येथे थांबा घेणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News