महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, ‘या’ १८ Railway स्थानकावर थांबा मंजूर

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी, विशेषतः नंदुरबार दोंडाईचा अमळनेर भुसावळ या रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी विशेष फायद्याची राहणार आहे. कारण की रेल्वे प्रशासनाने उत्तर महाराष्ट्र मार्गे एक विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Published on -

Maharashtra Railway News : एप्रिल महिना सुरू झाला की दरवर्षी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते. उन्हाळी सुट्ट्यांमुळे या काळात दरवर्षी रेल्वे गाड्या हाउसफुल धावतात. खरे तर उन्हाळी सुट्ट्या लागल्यात की अनेक जण आपल्या नातलगांकडे निघतात.

शहरात कामाला असणारी मंडळी आपल्या मूळ गावाकडे परतते. काहीजण पिकनिक साठी निघतात. दरम्यान, गावी जाणाऱ्या नागरिकांसाठी तसेच पर्यटकांसाठी रेल्वेच्या माध्यमातून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम रेल्वेकडूनही उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर उधना ते मालदा टाऊन दरम्यान दोन उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा करण्यात आली आहे.

महत्वाची बाब अशी की पश्चिम रेल्वेने जाहीर केलेली ही स्पेशल ट्रेन या मार्गावरील तब्बल १८ महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे या संबंधित १८ स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं असणार स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक.

उधना – मालदा टाऊन स्पेशल ट्रेन (गाडी क्रमांक ०३४१८) ही १४ एप्रिल रोजी उधनाहून मालदा टाऊनकडे धावणार असून, मालदा टाउन उधना समर स्पेशल ट्रेन ( गाडी क्रमांक ०३४१७ ) ही १२ एप्रिल रोजी मालदा टाऊनहून उधनाकडे रवाना होईल. या विशेष ट्रेंडमुळे पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या असंख्य प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे.

कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार स्पेशल ट्रेन?

पश्चिम रेल्वेने सुरू केलेल्या या समर स्पेशल ट्रेनला या मार्गावरील तब्बल १८ महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. या दोन्ही गाड्या उत्तर महाराष्ट्रातील अमळनेर, भुसावळ मार्गे धावणार आहेत.

प्रवाशांच्या सोयीसाठी या स्पेशल ट्रेनला चालठाणा, व्यारा, नवापूर, नंदुरबार, दोंडाईचा, अमळनेर, भुसावळ, इटारसी, पिपरिया, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, प्रयागराज, उपाध्याय, बक्सर, आरा आणि पटना या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe