महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज ! ‘या’ मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, 15 Railway स्थानकावर थांबणार, कसा असेल रूट ?

Maharashtra Railway News : एप्रिल महिना सुरू झाला की रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या ऑटोमॅटिक वाढते. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दरवर्षी अनेक जण आपल्या नातलगांकडे जात असतात. शहरात कामानिमित्ताने वास्तव्याला असणारे लोक आपल्या मूळ गावाकडे जातात. काही लोक पिकनिक साठी बाहेर पडतात.

यामुळे उन्हाळी सुट्ट्यांमध्ये दरवर्षी रेल्वे प्रवाशांची गर्दी वाढत असते. दरम्यान या अतिरिक्त गर्दीच्या पार्श्वभूमीवर आता कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोकण रेल्वेकडून मध्य रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने कोकण रेल्वे मार्गावर इरोड-बारमेर साप्ताहिक स्पेशल ट्रेन चालवली जाणार आहे. ही गाडी या मार्गावरील 15 महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे.

यामुळे कोकणातील प्रवाशांना गर्दीच्या काळातही सीमलेस कनेक्टिव्हिटीचा आनंद घेता येणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या समर स्पेशल ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणत्या 15 महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेऊ शकते यासंदर्भात माहिती पाहणार आहोत.

कसं राहणार समर स्पेशल ट्रेनचे वेळापत्रक?

रेल्वे प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, इरोड-बारमेर साप्ताहिक स्पेशल ट्रेन 8 एप्रिल ते 10 जून या कालावधीत चालवली जाणार आहे.

ही समर स्पेशल ट्रेन या काळात दर मंगळवारी इरोड येथून सकाळी सहा वाजून वीस मिनिटांनी सुटणार आहे आणि तिसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजता बारमेर येथे पोहचणार आहे.

परतीच्या प्रवासाबाबत बोलायचं झालं तर ही गाडी 11 एप्रिल ते 13 जून 2025 दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी दर शुक्रवारी बारमेर येथून रात्री दहा वाजून पन्नास मिनिटांनी सोडली जाणार आहे आणि तिसऱ्या दिवशी रात्री सव्वा आठ वाजता इरोड येथे पोहचणार आहे.

कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?

मध्य रेल्वेच्या समन्वयाने चालवल्या जाणाऱ्या समर स्पेशल ट्रेनला या मार्गावरील 15 महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मडगाव, करमाळी, थिविम, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, वैभववाडी, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पनवेल आदी स्थानकात ही गाडी थांबा घेणार आहे.

यामुळे कोकणात प्रवास करणाऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल अशी आशा आहे. या गाडीमुळे चाकरमान्यांचा प्रवास नक्कीच वेगवान होणार आहे.