महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! राज्यातून धावणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, महाराष्ट्रातील ‘या’ १० रेल्वे स्थानकावर थांबणार नवीन Railway

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मदुराई ते भगत की कोठी यादरम्यान ही विशेष गाडी चालवली जाणार ही गाडी महाराष्ट्रातून धावणार आहे आणि राज्यातील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे.

Published on -

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे विभागाकडून उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर अनेक मार्गांवर समर स्पेशल गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. दरम्यान रेल्वे प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेली मदुराई ते भगत की कोठी दरम्यानही विशेष गाडी चालवली जाणार असून ही विशेष गाडी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या स्थानकावरून धावणार आहे.

यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान आज आपण राज्यातून धावणाऱ्या या समर स्पेशल ट्रेनचे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कस असणार वेळापत्रक ?

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रशासन मदुराई ते भगत की कोठी दरम्यान चालवली जाणारी विशेष गाडी (गाडी क्रमांक ०६०६७ ) सोमवार, २१ एप्रिल पासून मदुराई येथून १०.४५ वाजता सुटणार आहे आणि भगत की कोठी येथे बुधवार १२.३० वाजता पोहोचणार आहे.

तसेच, परतीच्या प्रवासात भगत की कोठी ते मदुराई विशेष गाडी (गाडी क्रमांक ०६०६८) २४ एप्रिल रोजी भगत की कोठी येथून साडे पाच वाजता सुटणार आहे आणि मदुराई येथे शनिवार रोजी ०८.३० वाजता पोहोचणार आहे. दरम्यान, आता आपण ही विशेष गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार? यासंदर्भात माहिती पाहणार आहोत.

विशेष गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार ?

Railway मधील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मदुराई ते भगत की कोठी यादरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष गाडीला दिंडीगूल, तिरुचिरापल्ली, वृद्धाचलम, विल्लूपुरम, चेंगलपट्टू, तांबरम, चेन्नई एग्मोर, सुल्लुरुपेटा, गुडूर, नेल्लोर, ओंगोल, विजयवाडा, खम्मम, वारंगल,

बल्लारशाह, चंद्रपूर, वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, अंकलेश्वर, वडोदरा, आनंद, साबरमती, मेहसाणा, पाटण, भिलडी, राणीवारा, मारवाड भिनमाळ, मोडरान, जालोर, मोकलसर, समदरी, लुनी येथे थांबा मंजूर करण्यात आलेला आहे.

यामुळे या रेल्वे स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना देखील या गाडीचा मोठा फायदा होणार आहे. ही गाडी विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार असल्याने नक्कीच या संबंधित विभागातील रेल्वे प्रवाशांना याचा फायदा होणार अन अतिरिक्त गर्दीतही रेल्वे प्रवाशांचा प्रवास सोयीचा होईल अशी आशा आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News