मुंबई, पुणे, नागपूरमधील Railway प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ 2 रेल्वे मार्गावर सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, वेळापत्रकही निघालं, पहा….

Published on -

Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. देशात आणि महाराष्ट्रात नुकताच होळीचा मोठा सण साजरा झाला. राज्यात होळी धुलीवंदन आणि शिमगोत्सवाची मोठी धूम पाहायला मिळाली. यानंतर आता देशात अनेक मोठमोठे सण साजरे होणार आहेत.

पुढील काळ हा सणाचा राहणार आहे. याशिवाय उन्हाळी सुट्ट्या देखील राहतील. दरम्यान सणांच्या आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीमध्येच रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला.

उन्हाळी सुट्ट्यामध्ये रेल्वेगाडीने प्रवास करणार्‍या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मध्य नागपूर विभागाने मुंबई ते नागपूर आणि पुणे ते नागपूर दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केलेली आहे.

दरम्यान आज आपण मध्य नागपुर विभागाने जाहीर केलेल्या मुंबई-नागपूर-मुंबई व पुणे-नागपूर-पुणे दरम्यान विशेष रेल्वेगाड्याचे वेळापत्रक अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं राहणार नागपूर-मुंबई विशेष गाडीचे वेळापत्रक

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, एक द्वितीय श्रेणी, पाच तृतीय श्रेणी वातानुकूलित, १० शयनयान, चार सामान्य व दोन गार्ड ब्रेक असे एकूण ११ कोच असणारी गाडी नागपूर ते मुंबई दरम्यान चालवली जाणार आहे.

नागपूर मुंबई विशेष ट्रेन (गाडी क्रमांक ०२१३९) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर या दरम्यान आठवड्यातून दोन दिवस चालवले जाईल.

ही द्वि-साप्ताहिक विशेष गाडी आणि नागपूर मुंबई द्वि-साप्ताहिक विशेष गाडी (ट्रेन क्रमांक ०२१४०) नागपूर ते मुंबई दरम्यान ६ एप्रिल ते २९ जूनपर्यंत चालवण्यात येणार आहे. या दोन्ही गाड्या आठवड्यातून रविवारी व मंगळवारी धावणार आहेत.

नागपूर-पुणे विशेष गाडीचे वेळापत्रक

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार नागपूर ते पुणे दरम्यान २० कोच असणारी आणि १७ कोच असणारी विशेष गाडी चालवली जाणार आहे. २० कोच असणारी पुणे नागपूर विशेष गाडी (गाडी क्रमांक ०१४६९) ८ एप्रिल ते २४ जूनदरम्यान आठवड्यातून प्रत्येक मंगळवारी पुणे येथून रवाना होणार आहे अन गाडी क्रमांक ०१४७० ही नागपूर-पुणे विशेष गाडी ९ एप्रिल ते २५ जूनदरम्यान आठव्यातून प्रत्येक बुधवारी नागपूर येथून रवाना होईल.

याबरोबरचं १७ कोच असणारी पुणे-नागपूर विशेष गाडी (गाडी क्रमांक ०१४६७) ९ एप्रिल ते २५ जूनपर्यंत आठवड्यातून प्रत्येक बुधवारी पुणे येथून सुटेल. आणि गाडी क्रमांक ०१४६८ नागपूर-पुणे विशेष गाडी १० एप्रिल ते २६ जूनपर्यंत आठवड्यातून प्रत्येक गुरुवारी नागपूर येथून सोडली जाणार आहे.

नक्कीच मुंबई ते नागपूर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष गाडीमुळे आणि पुणे ते नागपूर दरम्यान चालवल्या जाणाऱ्या विशेष गाडीमुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून मध्ये रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये अनेक जण आपल्या मूळ गावाला जात असतात त्यामुळे या गाड्यांचा या लोकांनाही मोठा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe