Maharashtra Railway News : महाराष्ट्रात तसेच देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने तसेच रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात विस्तारलेले असल्याने रेल्वेने प्रवास करण्यास नेहमीच पसंत दाखवली जाते. देशातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे असले तरी देखील रेल्वे सहजतेने उपलब्ध असल्याने रेल्वेचा प्रवास हा फारच सोयीचा ठरतो.
मात्र आजही असे काही भाग आहेत जिथे रेल्वेचे नेटवर्क पोहोचलेले नाही. यामुळे देशातील अशा भागांमध्ये नवनवीन रेल्वे लाईन विकसित केल्या जात आहेत. महाराष्ट्रात देखील रेल्वे भागाकडून नवनवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत.

दरम्यान शासनाच्या माध्यमातून कराड कडेगाव पंढरपूर असा एक 154 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. हा रेल्वे मार्ग प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रासाठी फारच महत्त्वाकांक्षी ठरणार होता. या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे कनेक्टिव्हिटीला मोठा बूस्ट मिळणार होता.
मात्र पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरणारा हा 154 किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग प्रकल्प तब्बल सात वर्षांपूर्वीच रद्द करण्यात आला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. खरे तर या प्रकल्पाचे सर्वेक्षण 2014-15 मध्ये पूर्ण झाले.
मात्र सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतरही हा रेल्वे मार्ग प्रोजेक्ट आर्थिक परतावा दर कमी असल्याचे कारण पुढे करत रेल्वे विभागाकडून रद्द करण्यात आला. धक्कादायक म्हणजे हा प्रकल्प रद्द झाल्यानंतर जवळपास सात वर्ष हा प्रकल्प रद्द झाला आहे हेच जनतेसमोर आले नव्हते.
पण, सोनसळ येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. विश्राम कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा प्रकल्प रद्द झाला असल्याचे पुढे आले. 2397 कोटी रुपयांच्या हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यांसाठी फारच महत्त्वाचा ठरणार होता.
या जिल्ह्यांच्या कृषी उद्योग शिक्षण पर्यटन अशा सर्वच क्षेत्रांना मोठा फायदा होणार होता. मात्र हा प्रकल्प सरकारने रद्द केला आणि म्हणूनच पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला याचा मोठा फटका बसलाय.
मात्र कदम यांनी हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण जोरदार लढा उभारणार असल्याचे म्हणत या प्रकल्पासाठी आपला पाठपुरावा असाच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता सरकारने रद्द केलेला हा प्रकल्प सुरू होणार का हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.