Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. तुम्ही पण उद्या प्रवासाचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजधानी मुंबईत आंबेडकरी चळवळीच्या लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
दरवर्षी मुंबईत महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने आंबेडकरी अनुयायांची मोठी गर्दी होत असते. दरम्यान याही वर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून लाखो अनुयायी मुंबईत दाखल होणार आहेत.

यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असून याच आंबेडकरी अनुयायींसाठी रेल्वे प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. मध्य रेल्वेने यंदा अनुयायींसाठी विशेष तयारी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी मध्य रेल्वेच्या माध्यमातून पाच दिवस विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.
चार डिसेंबर ते 8 डिसेंबर या कालावधीत रेल्वे प्रशासनाकडून काही मार्गांवर विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. मध्य रेल्वे यावर्षी 15 अनारक्षित लांब पल्याच्या विशेष गाड्या चालवणार अशी माहिती देण्यात आली आहे.
यामुळे आंबेडकरी अनुयायींना राजधानी मुंबईत येणे सोपे होणार आहे. यावर्षी नागपूरसह संपूर्ण विदर्भातून मुंबईत दाखल होणाऱ्या आंबेडकरी अनुयायींसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विशेष सोय केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे प्रशासन नागपूर ते मुंबई दरम्यान आणि मुंबई ते अमरावती दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे. अशा स्थितीत आज आपण या विशेष गाड्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नागपूर–मुंबई एकेरी विशेष गाडीचे वेळापत्रक
सेंट्रल रेल्वेने सांगितल्याप्रमाणे, 01260, 01262, 01264 आणि 01266 या चार विशेष एकेरी गाड्या 4 आणि 5 डिसेंबर रोजी नागपूरहून विविध वेळांना सुटतील. या गाड्या दुसऱ्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), मुंबई येथे पोहोचतील.
महत्वाची बाब म्हणजे या गाड्या अजनी, सेवाग्राम, वर्धा, भुसावळ, मनमाड, नाशिक रोड, कल्याण व दादर या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा घेणार अशी माहिती देण्यात आली आहे.
मुंबई–नागपूर विशेष गाडीचं वेळापत्रक
01249, 01253, 01251, 01255 आणि 01257 या मुंबई–दादरहून सुटणाऱ्या पाच विशेष गाड्या नागपूरकडे धावणार आहेत. प्रवाशांच्या सोईसाठी या सर्व गाड्यांमध्ये 16 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आणि दोन ब्रेक-व्हॅन उपलब्ध असतील, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर अनारक्षित प्रवासी आरामात प्रवास करू शकतील.
अमरावती–मुंबई विशेष गाडी चालवली जाणार
विदर्भातील प्रवाशांसाठी अमरावती–मुंबई दरम्यान 01218 ही स्पेशल गाडी 5 डिसेंबर रोजी आणि 01217 ही स्पेशल गाडी 7 डिसेंबर रोजी या दोन विशेष गाड्या चालवल्या जातील. अमरावती मुंबई विशेष गाडीमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच दिलासा मिळणार आहे.













