Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. कोकण रेल्वे मार्गावर सुरू करण्यात आलेल्या एका विशेष एक्सप्रेस ट्रेन ला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीमध्ये कोकण रेल्वे मार्गावर वाढलेली अतिरिक्त गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाकडून उधना ते मंगळूर दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला होता. आता याच विशेष एक्सप्रेस ट्रेनला मुदतवाढ देण्याचा मोठा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

कधीपर्यंत धावणार उधना मंगळूरु विशेष एक्सप्रेस
पश्चिम रेल्वे कडून कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी उधना ते मंगळूरु (09057/09058) विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जात आहे. ही एक द्वीस्वाप्ताहिक विशेष गाडी आहे. यातील गाडी क्रमांक 09057 म्हणजे उधना-मंगळूरू या द्विसाप्ताहिक विशेष गाडीला 28 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
तसेच गाडी क्रमांक 09058 म्हणजेच मंगळुरू – उधना विशेष एक्सप्रेस ट्रेन ला 29 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आपण या गाडीचे वेळापत्रक कसे आहे याचा आढावा घेणार आहोत.
कसे आहे विशेष गाडीचे वेळापत्रक
या गाडीचे वेळापत्रक आधी सारखेच कायम ठेवण्यात आले आहे. गाडी क्रमांक 09057 म्हणजे उधना-मंगळूरू या कालावधीत दर बुधवार आणि रविवारी रात्री 8 वाजता उधना जंक्शनहून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री पावणेआठ वाजता ही गाडी मंगळूरू जंक्शनला पोहोचणार आहे.
परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 09058 म्हणजे मंगळूरू-उधना या काळात प्रत्येक गुरुवारी आणि सोमवारी रात्री दहा वाजून दहा मिनिटांनी मंगळुरु जंक्शनहून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रात्री अकरा वाजून पाच मिनिटांनी ही गाडी सुरत येथील उधना जंक्शनला पोहोचणार आहे.