महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! 24 जुलैपासून ‘या’ शहरातून तिरुपतीसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील तिरुपती बालाजीच्या भक्तांसाठी अधिक खास राहणार आहे.

Published on -

Maharashtra Railway News : तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने भाविक भगवान तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जातात. सणासुदीच्या दिवसांमध्ये तसेच उन्हाळी सुट्ट्यांमध्ये भाविकांची संख्या आणखी वाढत असते.

त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून लातूर ते तिरुपती दरम्यान सुपरफास्ट एक्सप्रेस ट्रेन चालवली गेली पाहिजे अशी मागणी प्रवाशांकडून उपस्थित केली जात होती. पण रेल्वे विभागाकडून या मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक असतानाही या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात होते.

पण अखेरकार गेल्यावर्षी लातूर मार्गे सोलापूर ते तिरुपती अशी साप्ताहिक गाडी चालवण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. या गाडीमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील भाविकांना जलद गतीने तिरुपतीला जाता येणे शक्य झाले.

परिणामी या गाडीला प्रवाशांकडून चांगला जोरदार प्रतिसाद सुद्धा मिळाला. मात्र अशी सगळी परिस्थिती असतानाच गेल्या महिन्यात ही एक्सप्रेस ट्रेन कोणतेही कारण न देता बंद करण्यात आली. त्यामुळे साहजिकच भाविकांमध्ये नाराजीची लाट उसळली.

गाडीला चांगला प्रतिसाद मिळत होता मग ही गाडी का बंद केली हा प्रश्न देखील यामुळे उपस्थित झाला. पण आता तिरुपती ला जाणाऱ्या भाविकांसाठी गुड न्यूज समोर आली आहे. रेल्वे विभागाने पुन्हा एकदा सोलापूर तिरुपती एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे. 

 कधी सुरू होणार सोलापूर तिरुपती एक्सप्रेस ट्रेन?

 मिळालेल्या माहितीनुसार 24 जुलै 2025 पासून सोलापूर तिरुपती एक्सप्रेस ट्रेन पुन्हा एकदा रुळावर धावणार आहे. सोलापूर येथून सुटणारी ही गाडी धाराशिव मग पुढे लातूर मार्गे तिरुपतीला जाणार आहे. रेल्वेने उद्यापासून सोलापूर-धाराशिव-लातूर-तिरुपती-धर्मावरम ही साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन सुरू करण्याची घोषणा केली आहे. 

वेळापत्रक कसे राहणार

या साप्ताहिक गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर गुरुवारी 24 जुलै रोजी ही गाडी रात्री अकरा वाजून वीस मिनिटांनी सोलापूर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी अर्थातच शुक्रवारी रात्री सव्वा दहा वाजता ही गाडी तिरुपती रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे. ही गाडी दर गुरुवारी सोलापूर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.

या गाडीमुळे सोलापूर, धाराशिव आणि तिरुपती या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये भाविकांना तिरुपती बालाजीला जाणे अधिक सोयीचे होणार आहे. हेच कारण आहे की या भागातील रेल्वे प्रवाशांमध्ये सोलापूर – तिरुपती सुपरफास्ट साप्ताहिक एक्सप्रेस ट्रेन बाबत सध्या मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!