महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! ‘या’ दोन मोठ्या शहरादरम्यान धावणार रेल्वे, तयार होणार नवीन मार्ग; कोणकोणत्या तालुक्यातुन जाणार ?

Tejas B Shelar
Published:

Maharashtra Railway News : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच उल्लेखनीय आहे. याचे कारण म्हणजे रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडणारा आहे तसेच रेल्वेचे नेटवर्क हे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहेत. मात्र अजूनही असे काही शहरे आहेत जे रेल्वेने जोडले गेलेले नाहीत. मराठवाड्यातील जालना ते उत्तर महाराष्ट्रातील जळगाव या दरम्यानही रेल्वे मार्ग नाहीये.

यामुळे महाराष्ट्रातील ही दोन महत्त्वाची शहरे रेल्वेने जोडली गेली पाहिजेत अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. दरम्यान आता ही मागणी पूर्ण होणार आहे. केंद्रातील सरकारने या रेल्वे मार्गाला नुकतीच मंजुरी दिली आहे. यामुळे नॉर्थ महाराष्ट्र आणि मराठवाडा परस्परांना जोडले जाणार असून यामुळे या दोन्ही विभागातील विकासाला चालना मिळणार आहे.

हा रेल्वेमार्ग तब्बल 174 किलोमीटर लांबीचा राहणार असून यासाठी 7105 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय हा काल अर्थातच 9 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

सरकारने या रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे मात्र हा मार्ग नेमक्या कोणकोणत्या तालुक्यामधून जाणारा हा प्रश्न अजूनही कायम आहे. अशा परिस्थितीत आज आपण केंद्रातील सरकारने मंजूर केलेला हा मार्ग नेमका कोणकोणत्या तालुक्यांमधून जाणार आहे? यासंदर्भात माहिती पाहणार आहोत.

कसा राहणार जालना-जळगाव रेल्वे मार्ग?

मराठवाडा ते खानदेश हा प्रवास वेगवान व्हावा यासाठी हा रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे. या 174 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गामुळे मराठवाड्यातील जनतेला खानदेशात तसेच मुंबई दिल्ली सारख्या शहरात जलद गतीने पोहोचता येणार आहे. खरे तर या रेल्वेमार्ग प्रकल्पासाठी अनेक वेळा सर्वे करण्यात आलेत.

यामुळे हा प्रकल्प नेमक्या कोणत्या तालुक्यातून जाणार हा मोठा सवाल आहे. दरम्यान, आता याच संदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा रेल्वे मार्ग जालना येथून सुरु होईल मग पुढे भोकरदन तालुक्यात येईल. त्यानंतर सिल्लोडच्या दिशेने रेल्वेमार्ग वळवण्यात येईल.

सिल्लोडनंतर रेल्वेमार्ग थेट अजिंठा आणि पहूर मार्ग जामनेर तसेच जळगावला जोडला जाणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या 5 वर्षात या रेल्वेमार्गाचे काम सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे जालना ते जळगाव हा प्रवास वेगवान होणार आहे.

मराठवाड्यातील आणि उत्तर महाराष्ट्रातील विकासाला या प्रकल्पामुळे खऱ्या अर्थाने चालना मिळेल असा आशावाद आता व्यक्त होत आहे. हा प्रकल्प कृषी, शिक्षण, उद्योग, अध्यात्म, पर्यटन अशा विविध क्षेत्रांसाठी फायद्याचा राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe