महाराष्ट्रातील नाशिक-अहिल्यानगर-पुणे जिल्ह्यांना जोडणारा ‘हा’ Railway मार्ग प्रकल्प पुन्हा चर्चेत ! मुंबईत मोठी बैठक, रूट पुन्हा बदलणार का ?

पुणे आणि नाशिक ही दोन महत्त्वाची शहरे अजूनही रेल्वे मार्गाने जोडलेली नाहीत. मात्र पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. खरे तर, जेव्हा हा रेल्वे मार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला तेव्हा याचा रूट पुणे आळेफाटा संगमनेर नाशिक असा निश्चित करण्यात आला होता. संगमनेर मार्गे हा रूट फारच सोयीस्कर राहणार होता. मात्र आता सरकारने या प्रकल्पाचा रूट बदलला आहे.

Published on -

Maharashtra Railway News : गेल्या काही वर्षांमध्ये आपल्या देशात वेगवेगळ्या रेल्वे मार्गांची आणि रस्ते मार्गांची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे देशातील दळणवळण व्यवस्था ही आधीच्या तुलनेत अधिक सक्षम दिसते. मात्र महाराष्ट्रातील सुवर्ण त्रिकोणात समाविष्ट असणाऱ्या दोन शहरांमध्ये आजही रेल्वेची कनेक्टिव्हिटी नाहीये. पुणे आणि नाशिक ही दोन महत्त्वाची शहरे अजूनही रेल्वे मार्गाने जोडलेली नाहीत.

मात्र पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र नुकत्याच काही दिवसांपूर्वी सरकारने या रेल्वे मार्गाच्या रूट मध्ये बदल करण्याचा मोठा निर्णय घेतला. खरे तर, जेव्हा हा रेल्वे मार्ग प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला तेव्हा याचा रूट पुणे आळेफाटा संगमनेर नाशिक असा निश्चित करण्यात आला होता. संगमनेर मार्गे हा रूट फारच सोयीस्कर राहणार होता.

यामुळे, या रेल्वे मार्ग प्रकल्पाचा अहिल्यानगरसहित नाशिक जिल्ह्यातील नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार होता. मात्र आता सरकारने या प्रकल्पाचा रूट बदलला आहे. हा रेल्वे मार्ग आता संगमनेर व्हाया नाहीतर शिर्डी व्हाया नेला जाणार आहे.

सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पात जुन्नर तालुक्यातील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’ (जीएमआरटी) प्रकल्प येत असल्याने हा मार्गच रद्द केला असून, त्याऐवजी पुणे, अहिल्यानगर, शिर्डीमार्गे नाशिक असा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब अशी की त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुद्धा हाती घेण्यात आले आहे.

परंतु हा प्रकल्प पूर्वीच्या नियोजित मार्गानेच व्हावा यासाठी आता लोकप्रतिनिधींनी कंबर कसली आहे. पूर्वीच्या रूटप्रमाणे हा मार्ग व्हावा यासाठी मुंबईमध्ये नुकतीच सर्व पक्षाच्या लोकप्रतिनिधींची महत्त्वाची आणि अगदीच मोठी बैठक संपन्न झाली असून यासाठी सर्वपक्षीय कृती समितीची स्थापना करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे.

या बैठकीला आ. माणिकराव कोकाटे, आ. सत्यजीत तांबे, आ. दिलीप वळसे पाटील आणि आ. अमोल खताळ हे प्रत्यक्षरीत्या उपस्थित होते. तर खा. राजाभाऊ वाजे, खा. भाऊसाहेब वाकचौरे, खा. अमोल कोल्हे, आ. बाबाजी काळे आणि आ. शरद सोनावणे हे ऑनलाईन पद्धतीने बैठलीला उपस्थित होते.

दरम्यान या सर्व लोकप्रतिनिधींनी येत्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या सोबत बैठक घेण्याचे ठरवले आहे आणि रेल्वे मंत्रालयाकडे सुद्धा या प्रकल्पासाठी पाठपुरावा करण्याची रणनीती ठरवण्यात आली आहे.

पुणे-अहिल्यानगर-नाशिक हा रेल्वे प्रकल्प सरळमार्गे झाला तरच याचा फायदा होईल असे म्हटले जात आहे. हा मार्ग सरळ सरळ तयार झाला तर दोन्ही शहरांमधील अंतर कमी होणार आहे. पण जर हा मार्ग शिर्डी मार्गे नेला गेला तर जवळपास 70 ते 80 किलोमीटर अंतर वाढणार अशी भीती आहे. यामुळे प्रवाशांना अधिकचा वेळ लागणार आहे.

हा मार्ग शिर्डीवरून गेला तर प्रवासाचा कालावधी तब्बल दीड तासांनी वाढणार असल्याचा दावा केला जातोय. हेच कारण आहे की हा प्रकल्प जुन्या मार्गानेच म्हणजेच संगमनेर वाया व्हावा यासाठी आता स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू झाला आहे. तरीही सरकार आता याबाबत काय निर्णय घेणार? हा मार्ग शिर्डी वरून जाणार की संगमनेर वरून हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe