महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! राज्यातील ‘या’ 15 Railway स्टेशनवर थांबणार, रूट पहा….

दरवर्षी रेल्वे उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यात की विशेष गाड्यांची घोषणा करत असते. या गाड्यांमुळे साहजिकच राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे. दरम्यान रेल्वेने मुंबई ते नागपूर या दरम्यानही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला असून आज आपण याच विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published on -

Maharashtra Railway News : उन्हाळी सुट्ट्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे कडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी रेल्वे उन्हाळी सुट्ट्या सुरू झाल्यात की विशेष गाड्यांची घोषणा करत असते. यंदाही रेल्वेने देशातील अनेक महत्त्वाच्या रेल्वे मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला असून मुंबई पुणे नागपूर यांसारख्या शहरांमधून अनेक स्पेशल ट्रेन आता धावताना दिसणार आहेत. या गाड्यांमुळे साहजिकच राज्यातील रेल्वे प्रवाशांचा प्रवास वेगवान होणार आहे.

दरम्यान रेल्वेने मुंबई ते नागपूर या दरम्यानही विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला असून आज आपण याच विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच ही गाडी राज्यातील कोणत्या महत्त्वाच्या 15 रेल्वे स्थानकावर थांबा घेणार याबाबतही आता आपण डिटेल माहिती पाहणार आहोत.

कस राहणार विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक?

रेल्वे कडून मिळालेल्या माहितीनुसार उन्हाळी सुट्ट्या सुरू होण्याआधीच रेल्वेने मुंबई ते नागपूर यादरम्यान स्पेशल ट्रेनच्या 50 फेऱ्या घोषित केल्या आहेत. मुंबई येथील सीएसएमटी ते नागपूर दरम्यान रेल्वे कडून द्विसाप्ताहिक विशेष गाडी चालवली जाणार आहे.

गाडी क्र. 02939 ही द्विसाप्ताहिक विशेष गाडी सीएसएमटी येथून 6 एप्रिल ते 29 जून दरम्यान सोडली जाणार आहे. या काळात ही गाडी दर मंगळवारी व रविवारी रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी सीएसएमटी येथून निघणार आहे आणि नागपुरात त्याच दिवशी तीन वाजून 30 मिनिटांनी पोहोचणार आहे. म्हणजेच या गाडीच्या एकूण 25 फेऱ्या होणार आहेत.

दुसरीकडे गाडी क्र. 02140 द्विसाप्ताहिक विशेष गाडी 6 एप्रिल ते 29 जून दरम्यान चालवली जाणार असून या काळात ही गाडी प्रत्येक मंगळवारी आणि रविवारी नागपूर रेल्वे स्थानकावरून रात्री आठ वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे.

म्हणजे या गाडीच्या सुद्धा 25 फेऱ्या होणार आहेत. मुंबई ते नागपूर अशा 25 आणि नागपूर ते मुंबई अशा 25 अशा तऱ्हेने या स्पेशल ट्रेनच्या 50 फेऱ्या होणार आहेत. या गाडीच्या रचनेबाबत बोलायचं झालं तर यात एक द्वितीय वातानुकुलित, 5 तृतीय वातानुकूलित, 10 शयनयान, 4 सामान्य द्वितीय श्रेणी आणि 2 सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन राहणार आहे.

विशेष गाडी कोण-कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

रेल्वे कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार ही विशेष गाडी दादर (फक्त 02139 साठी), ठाणे, कल्याण, इगतपुरी (फक्त 02140 साठी), नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe