Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पश्चिम आणि दक्षिण भारताला जोडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नवीन गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने दोन नव्या गाड्या सुरु केल्या आहेत.
सुरत रेल्वे मार्गावर होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी पाहता पश्चिम रेल्वे प्रशासनाने राजकोट – महबूबनगर आणि ओखा – मदुराई या मार्गांवर उत्सव स्पेशल गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही उत्सव स्पेशल ट्रेन विशेष भाड्याने चालवल्या जातील अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून समोर आली आहे.

दरम्यान आता आपण या दोन्ही उत्सव स्पेशल गाड्यांचे वेळापत्रक कसे आहे आणि या गाड्या कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याविषयीची डिटेल माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राजकोट – महबूबनगरचं वेळापत्रक कस असणार ?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, राजकोट – महबूबनगर साप्ताहिक विशेष गाडी तीन नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी दर सोमवारी राजकोट येथून 13.45 वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी 20.00 वाजता महबूबनगर येथे पोहोचणार आहे.
या गाडीच्या एकूण चार फेऱ्या होणार आहेत. तसेच महबूबनगर – राजकोट विशेष गाडी चार नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान चालवले जाणार आहे. या काळात ही गाडी दर मंगळवारी महबूबनगर येथून रात्री 23.00 वाजता सोडली जाणार आहे आणि गुरुवारी ही गाडी सकाळी 5.00 वाजता राजकोट येथे पोहोचणार आहे.
राजकोट – महबूबनगर विशेष गाडी कुठे थांबणार
ही गाडी महाराष्ट्रातील जवळपास दहा – अकरा रेल्वे स्थानकावर थांबा घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. वांकानेर, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आणंद, वडोदरा, उधना, नंदुरबार, जळगाव, भुसावळ, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत, पूर्णा, नांदेड़, मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल, काचीगुडा, शादनगर व जडचर्ला येथे या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला आहे.
ओखा – मदुराई रेल्वे गाडीचे वेळापत्रक
ओखा – मदुराई विशेष गाडी तीन नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी प्रत्येक सोमवारी ओखा येथून सोडले जाणार आहे आणि गुरुवारी सकाळी ही गाडी मदुराईला पोहोचेल.
तसेच मदुराई – ओखा विशेष गाडी 7 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान प्रत्येक शुक्रवारी मदुराई येथून सोडली जाणार आहे आणि रविवारी ही गाडी ओखा येथे पोहोचणार आहे.
कोण कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबणार?
ही गाडी महाराष्ट्रातील सात-आठ महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार आहे. ही गाडी तिरुपती ला जाणाऱ्या भाविकांसाठी फायद्याची ठरणार आहे. रेनिगुंटा या स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आला असल्याने ज्या लोकांना तिरुपतीला जायचे असेल त्यांच्यासाठी ही गाडी फायद्याची ठरेल.
द्वारका, जामनगर, राजकोट, सुरेंद्रनगर, अहमदाबाद, नडियाद, आणंद, वडोदरा, भरूच, उधना, नंदुरबार, आमलनेर, जळगाव, भुसावळ, अकोला, पूर्णा, हजूर साहेब नांदेड़, निजामाबाद, काचीगुडा, महबूबनगर, डोन, गूटी, रेनीगुंटा, काटपाडी, वेल्लोर कँटोनमेंट, तिरुवन्नामलाई, विलूपुरम, श्रीरंगम, तिरुचिरापल्ली, मणप्पारै, डिंडीगुल व कोडाईकनाल या रेल्वे स्टेशनवर या गाडीला थांबा मंजूर करण्यात आलाय.













