महाराष्ट्राला मिळणार 174 किलोमीटर लांबीचा नवा Railway मार्ग ! 7 हजार 105 कोटींचा खर्च, ‘ही’ शहरे जोडली जाणार, केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

देशातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे म्हटले की रेल्वेचा पर्याय सर्वात बेस्ट ठरतो. मात्र आजही देशात असे काही भाग आहेत जे की रेल्वेने कनेक्ट झालेले नाहीत. खानदेश आणि मराठवाडा हे महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे विभाग अन हेच दोन विभाग जोडण्यासाठी रेल्वे कडून एक नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला असून याला नुकतीच केंद्राची मंजुरी देखील मिळाली आहे.

Published on -

Maharashtra Railway News : महाराष्ट्रात आणि देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. रेल्वेचा प्रवास खिशाला परवडणारा असतो आणि रेल्वेचे नेटवर्क हे देशातील सर्वात मोठे दळणवळणाचे नेटवर्क आहे. यामुळे देशातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे म्हटले की रेल्वेचा पर्याय सर्वात बेस्ट ठरतो. मात्र आजही देशात असे काही भाग आहेत जे की रेल्वेने कनेक्ट झालेले नाहीत.

दरम्यान हेच भाग रेल्वेने जोडण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याचं अनुषंगाने महाराष्ट्राला देखील एका नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळणार आहे. खानदेश आणि मराठवाडा हे महाराष्ट्रातील दोन महत्त्वाचे विभाग अन हेच दोन विभाग जोडण्यासाठी रेल्वे कडून एक नवीन रेल्वे मार्ग प्रस्तावित करण्यात आला असून याला नुकतीच केंद्राची मंजुरी देखील मिळाली आहे.

यामुळे मराठवाडा ते खानदेश दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ आणि नुकत्याच काही महिन्यांपूर्वी जळगाव ते जालना रेल्वे मार्गाला मंजुरी दिलेली आहे.

खरे तर हा रेल्वे मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्तावित होता आणि अखेरकार याला आता केंद्राची मंजुरी मिळालेली आहे. या रेल्वेमार्गाला मंजुरी मिळाल्यावर आता जमीन अधिग्रहणाचे प्रस्ताव सुद्धा तयार करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या रेल्वे मार्गाची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसा असणार नवा रेल्वे मार्ग ?

मराठवाडा आणि खानदेश या दोन विभागांना जोडणारा हा रेल्वे मार्ग 174 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी 7105 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार असून यामुळे वेरूळ आणि अजिंठाला पोहोचणे सोपे होणार आहे. दरम्यान या रेल्वे मार्गाबाबत रेल्वे अधिकाऱ्यांनी नुकतीच एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, येत्या काही महिन्यात सदर रेल्वे मार्गाचे सर्वेक्षणाचे काम सुरु होणार आहे. या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी दिल्लीवरून आदेश देण्यात येणार आहेत. या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण झाल्यानंतर मग भूसंपादन, मोबदला, इतर सोयी, रेल्वेस्थानकांची निर्मिती आदींचीही निविदा प्रक्रिया काढली जाणार आहे.

एकंदरीत आगामी काळात प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होऊन या रेल्वेमार्गाच्या कामास सुरूवात होऊ शकते. या रेल्वेमार्ग प्रकल्पाला रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर गावनिहाय भूसंपादनाचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. जमीन अधिग्रहणाचे प्रस्ताव रेडी होत असल्याने या रेल्वे मार्ग प्रकल्पाला चालना मिळाली आहे.

यात भोकरदन तालुक्यातील 16 गावांचा सुद्धा समावेश आहे अन या संबंधित गावांमध्ये जमीन अधिग्रहणाचे प्रस्ताव रेडी होत आहेत. दुसरीकडे, इतरही तालुक्यांमधील गावांचे प्रस्ताव रेडी होत आहेत.

या रेल्वे प्रकल्पाच्या ब्रॉडगेज लाईनच्या बांधकामासाठी जमीन संपादित करावयाची असल्याने त्या संबंधित गावामध्ये कोणत्याही प्रकारचे खरेदी विक्रीचे व्यवहार किंवा अन्य कोणत्याही प्रकारे जमीन हस्तांतरण करण्यात येऊ नये, असे सुद्धा रेल्वे प्रशासनाकडून बजावण्यात आले आहे आणि याबाबतचे पत्रही देण्यात आले आहे.

नक्कीच हा रेल्वे मार्ग प्रकल्प झाला तर जालना ते जळगाव यादरम्यानचा प्रवास वेगवान होणार असून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या दोन्ही विभागांमध्ये कृषी, पर्यटन, उद्योग, अध्यात्म आणि शिक्षण अशा विविध क्षेत्राला या रेल्वे मार्ग प्रकल्पाचा मोठा फायदा होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe