महाराष्ट्राला मिळणार आणखी एक नवीन Railway मार्ग ! रेल्वे मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद, कोण-कोणते जिल्हे जोडले जाणार ?

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन विभागांना जोडणाऱ्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला चालना मिळाली आहे.

Published on -

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वेचे नेटवर्क आणखी मजबूत होणार आहे. कारण की भविष्यात महाराष्ट्राला आणखी एका नव्या रेल्वेमार्गाची भेट मिळणार आहे. सध्या भारतातील रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असून हे नेटवर्क विस्तारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहे.

या अनुषंगाने देशभरात नवनवीन रेल्वे मार्ग विकसित होत आहेत. आपल्या महाराष्ट्रात देखील नवीन मार्ग तयार केले जात आहेत. तर दुसरीकडे राज्यात असेही काही रेल्वे प्रकल्प आहेत जे की गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडले आहेत. वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग प्रकल्प देखील असाच एक दुर्लक्षित प्रकल्प बनला आहे.

हा प्रकल्प पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला जोडणारा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. यामुळे पश्चिम महाराष्ट्रातून कोंकण आणि कोकणातून पश्चिम महाराष्ट्र हा प्रवास वेगवान होणार आहे. कोल्हापूर जिल्हा सहित कोकणातील एकात्मिक विकासासाठी हा प्रकल्प फारच महत्त्वाची भूमिका निभावण्याची क्षमता ठेवतो.

मात्र या प्रकल्पाच्या संदर्भात ठोस कार्यवाही होत नाहीये. पण आता हा प्रकल्प प्रत्यक्षात दृष्टिक्षेपात येईल अशी आशा व्यक्त होत आहे. कारण की, या प्रकल्पासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मकता दाखवली आहे.

वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे मार्गाला चालना 

खरंतर, कोकणातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांनी कोकणातील रेल्वे प्रवाशांच्या विविध मागण्यांसाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीत खासदार नारायण राणे यांनी कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्गाचा प्रश्न उपस्थित केला.

दरम्यान या रेल्वे मार्गासंदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मकता दाखवली आहे. कोल्हापूर-वैभववाडी या रेल्वे मार्गाला लवकरच चालना देण्याची ग्वाही देतानाच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या रेल्वे मार्गाचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश सुद्धा प्रशासनाला दिलेत अशी माहिती या बैठकीतून समोर आली.

हेच कारण आहे की भविष्यात कोल्हापूर-वैभववाडी या बहुप्रतिक्षित रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती मिळेल अशी आशा आहे. या प्रस्तावित रेल्वे प्रकल्पामुळे कोकणातील औद्योगिक विकासाला सोबतच मत्स्य व्यवसायाला चालना मिळणार आहे आणि कोकणातील एकात्मिक विकास सुनिश्चित होणार आहे.

यामुळे कोकण ते कोल्हापूर हा प्रवास वेगवान होणार आहे. वैभववाडी कोल्हापूर रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे आदेश रेल्वेमंत्र्यांकडून जारी करण्यात आले असल्याने आगामी काळात चिपळूण ते कराड यादरम्यान सुद्धा नवा रेल्वे मार्ग तयार होईल अशी आता कोकणवासीयांकडून व्यक्त होत आहे.

नक्कीच जर रेल्वेमंत्र्यांनी कोल्हापूर वैभववाडी रेल्वे मार्ग प्रकल्पाला लवकरात लवकर मंजुरी दिली आणि हा प्रकल्प लवकर पूर्ण झाला तर यामुळे कोकणाच्या विकासाचा वेग वाढणार आहे. यासोबतच जर भविष्यात चिपळूण ते कराड हा मार्ग तयार झाला तर पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी आणखी एक जवळचा पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!