महाराष्ट्रातील ‘या’ शहरात तयार होणार नवीन रेल्वे स्थानक! केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

Published on -

Maharashtra Railway Station News : महाराष्ट्रात तसेच देशात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच उल्लेखनीय आहे. रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने तसेच रेल्वेचे नेटवर्क हे देशातील कानाकोपऱ्यात पसरलेले असल्याने रेल्वेने प्रवास करण्यास विशेष पसंती दाखवली जाते.

रेल्वेच्या माध्यमातूनही प्रवाशांचा प्रवास वेगवान व्हावा यासाठी वेगवेगळ्या भागात नवनवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. देशातील अनेक शहरांमध्ये रेल्वेचे मोठमोठे प्रकल्प प्रस्तावित आहेत. दरम्यान राज्यातील एका महत्त्वाच्या शहरात नवीन रेल्वे स्थानक तयार होणार आहे. हे नवे रेल्वे स्थानक ठाण्याजवळ तयार होणार आहे.

मुलुंड-ठाणे दरम्यान नवीन रेल्वे स्थानक विकसित होणार असून आता याच प्रकल्पाबाबत एक नवे अपडेट हाती आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पाच्या कामाला वेग देण्यासाठी आणि मुंबई-ठाणे तसेच उपनगरातील प्रवाशांच्या सोयीसुविधा वाढवण्यासाठी नुकतेच एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

नवीन रेल्वे स्थानकाचा प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावा या स्थानकाचे काम जलद गतीने व्हावे या अनुषंगाने कल्याण लोकसभेचे खासदार उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांनी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे.

या बैठकीत प्रवाशांना अधिक चांगली सेवा मिळावी, त्यांच्या सुरक्षिततेत वाढ व्हावी आणि रेल्वेच्या पायाभूत सुविधा सुधारल्या जाव्यात, यासंदर्भात चर्चा झाली. ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर लोकसभा मतदारसंघांतील प्रवाशांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि नवीन रेल्वेगाड्या सुरू करण्यासाठी केलेल्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला.

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याची ग्वाही देत ॲक्शन प्लॅन तयार करण्याचे आश्वासन दिले. महिलांसाठी विशेष लोकल सेवा सुरू करणे, स्वच्छ आणि दर्जेदार स्वच्छतागृहे उपलब्ध करणे, स्थानकांवरील महिला शौचालयांच्या सुविधेत सुधारणा करणे, तसेच प्रथम श्रेणीतील महिला डब्यांमध्ये बसण्याच्या जागा वाढवण्याची मागणी करण्यात आली.

त्याचबरोबर, प्रवासादरम्यान महिलांच्या सुरक्षेसाठी रात्री आणि सकाळच्या वेळेत महिला सुरक्षारक्षक तैनात करण्याची आवश्यकता असल्याचे मत खासदारांनी व्यक्त केले. अपघात झाल्यास प्रवाशांना तत्काळ सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळावेत, यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष पावले उचलावीत, अशी मागणीही करण्यात आली.

रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करणे, रेल्वे उड्डाणपूल आणि अंडरपास प्रकल्प जलदगतीने पूर्ण करणे, तसेच ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान प्रस्तावित नवीन स्थानकाच्या कामाला गती देणे या मुद्द्यांवरही विशेष भर देण्यात आला.

ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि कल्याण या भागांमध्ये ऑटोमॅटिक जिन्यांची सोय करण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. याशिवाय, स्थानकांवरील वन रुपीज क्लिनिक पुन्हा सुरू करण्याची गरज असल्याचे खासदारांनी निदर्शनास आणले.

अनेक ठिकाणी ही केंद्रे बंद असून, प्रवाशांसाठी ती अतिशय महत्त्वाची आहेत. त्यामुळे ही सेवा तत्काळ पूर्ववत करण्याची मागणीही केली. या चर्चेमुळे लवकरच या सर्व सुविधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे, असे संकेत मिळाले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe