महाराष्ट्राला मिळणार आणखी एका नव्या रेल्वे मार्गाची भेट ! ‘या’ नव्या रेल्वे मार्गाचा हवाई सर्वे झाला पूर्ण

राज्याला भविष्यात आणखी एक नवीन रेल्वे मार्ग मिळणार आहे. या नव्या रेल्वे मार्गाचा पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि खानदेशातील प्रवाशांना फायदा मिळणार आहे.

Published on -

Maharashtra Railway : राज्यातील नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे महाराष्ट्राला लवकरच एक नव्या रेल्वे मार्गाची भेट मिळणार असून या प्रस्तावेत नव्या रेल्वे मार्गाचा हवाई सर्वे नुकताच पूर्ण झाला आहे. खरंतर भारतीय रेल्वेचे नेटवर्क जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे.

विशेष म्हणजे देशातील रेल्वे नेटवर्क आणखी विस्तारले जात आहे. महाराष्ट्रातही सरकारकडून नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहेत. धाराशिव ते चाळीसगाव दरम्यानही रेल्वे मार्ग विकसित केला जाणार असून याच रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत आता एक महत्त्वाचे अपडेट हाती आली आहे. 

काय आहे नवीन अपडेट ?

धाराशिव ते चाळीसगाव दरम्यान रेल्वे मार्ग विकसित केला जाणार असून हा रेल्वे मार्ग बीड – छत्रपती संभाजी नगर – कन्नड असा तयार केला जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे या प्रस्तावित रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण देखील नुकतेच पूर्ण झाले आहे.

या सर्व्हेचे काम हैदराबाद येथील आव इंजिनिअरिंग कन्सल्टन्सी कडून पूर्ण करण्यात आले आहे. दरम्यान या प्रस्तावित धाराशिव – चाळीसगाव रेल्वे मार्गामुळे सोलापूर ते छत्रपती संभाजी नगर हा प्रवास वेगवान होणार आहे. या नव्या मार्गामुळे पश्चिम महाराष्ट्र ते मराठवाड्यासाठी एक नवीन रेल्वे मार्ग तयार होईल.

पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर ते मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर यादरम्यान उत्तम कनेक्टिव्हिटी सुद्धा मिळणार आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की या मार्गासाठी धाराशिव ( आधीचे उस्मानाबाद ) या जिल्ह्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून सोलापूर जिल्ह्यात देखील भूसंपादनाची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे.

सोलापूर जिल्ह्यातील भूसंपादनाची प्रक्रिया जवळपास अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर पुढील कार्यवाही सुरू होईल अशी आशा आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूसंपादनाचे काम पूर्ण झाले असून धाराशिव ते तुळजापूर या दरम्यानच्या रेल्वे मार्गाचे काम सुद्धा सुरू करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

हा रेल्वे मार्ग पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्याला मराठवाडा सोबत तर जोडणार आहेच शिवाय यामुळे सोलापूरची खानदेश सोबतची कनेक्टिव्हिटी आणखी वाढेल आणि यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यासह खानदेशातील अनेक भागांमधील विकासाला चालना मिळणार आहे. हा रेल्वे मार्ग उत्तर भारत आणि दक्षिण भारत या दोन्ही विभागांना जोडणारा जवळचा मार्ग राहील. 

सोलापूर धाराशिव टप्प्याचे 35 टक्के काम पूर्ण 

धाराशिव ते चाळीसगाव दरम्यानच्या नव्या प्रस्तावित रेल्वे मार्गाबाबत बोलायचं झालं तर या रेल्वे मार्गाचे सोलापूर-धाराशीव या टप्प्याचे 35% इतके काम पूर्ण झाले आहे. तर दुसरीकडे धाराशिव ते छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर ते चाळीसगाव या रेल्वेमार्गाच्या फायनल लोकेशन सर्व्हेसुद्धा पूर्ण करण्यात आले आहे.

या मार्गाच्या हवाई सर्वेक्षणासाठी रेल्वे बोर्डाने गेल्या अर्थसंकल्पात आठ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. दरम्यान हा निधी मंजूर झाल्यानंतरच या प्रकल्पाच्या हवाई सर्वेक्षणाला सुरुवात झाली आणि अखेरकार हे सर्वेक्षण पूर्ण झाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!