Maharashtra Railway : केंद्रातील मोदी सरकारकडून नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याला दोन नव्या रेल्वे मार्गाची भेट मिळणार आहे. मोदी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची सर्वसामान्यांची मागणी पूर्ण होणार आहे.
राज्याच्या एकात्मिक विकासासाठी सरकारचा निर्णय गेमचेंजर ठरणार आहे. या नव्या महात्मा गांधी प्रकल्पाची किंमत 11,420 कोटी रुपये आहे. नक्कीच सरकारच्या या निर्णयाचा राज्यातील जनतेला मोठा फायदा होणार आहे.

त्यामुळे राज्यातील एकात्मिक विकासाला चालना मिळणार असा विश्वास व्यक्त होतोय. रेल्वे हे प्रवासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग सगळीकडे रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवास होतो.
सरकार देखील रेल्वेचे नेटवर्क वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. सरकारकडून नवनवीन रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. गेल्या काही वर्षात आपल्या महाराष्ट्रात देखील अनेक मोठमोठे रेल्वे मार्ग तयार झाले आहेत.
तसेच काही रेल्वे मार्ग प्रकल्पांची कामे अजूनही सुरूच आहेत. अशातच आता राज्यातील दोन महत्त्वाच्या रेल्वे मार्ग प्रकल्पांना केंद्रातील सरकारकडून नुकतीच मंजुरी मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने भुसावळ – वर्धा तिसरी व चौथी मार्गिका तसेच गोंदिया ते दोडडगदरम्यानच्या नव्या रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.
या दोन्ही प्रकल्पांचा एकत्रित खर्च 11400 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. दरम्यान आता आपण या दोन्ही मार्गांचे रूट कसे आहेत याचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसे असणार नवे मार्ग
भुसावळ – वर्धा तिसरी व चौथी मार्गिका
लांबी – 314 किलोमीटर
खर्च – 9117 कोटी
डेडलाईन – 2030
गोंदिया ते दोडडग
लांबी – 84.10 किमी
प्रकल्प खर्च – 2303 कोटी
डेडलाईन – 2031