Maharashtra Railway : भारतात उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम अशा चारही बाजूने रेल्वेचे जाळे तयार करण्यात आले आहे. काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत भारतातील कोणत्याही कोपऱ्यात जायचे असेल तर रेल्वेचा पर्याय उपलब्ध होतो.
भारताचे रेल्वे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वाधिक मोठे रेल्वे नेटवर्क आहे. महत्त्वाची बाब म्हणजे देशात जवळपास तेरा हजाराहून अधिक रेल्वे गाड्या धावत आहेत. यातून जवळपास चार ते साडेचार कोटी प्रवासी प्रवास करतात.

तुम्हीही कधी ना कधी भारतीय रेल्वेने प्रवास केला असेल नाही का ? पण तुम्हाला जगातील सर्वाधिक लांब ट्रेन कुठून धावते याची माहिती आहे का ? नाही ना मग आज आपण याच बाबत माहिती पाहणार आहोत.
या मार्गावर धावते जगातील सर्वाधिक लांब ट्रेन
जगातील सर्वाधिक लांब ट्रेन आपल्या भारतात चालवली जाते. ही गाडी आपल्या महाराष्ट्रातून सुद्धा धावते. या ट्रेनच्या लांबी बाबत बोलायचं झालं तर ही ट्रेन साडेतीन किलोमीटर इतकी लांब आहे.
ही गाडी छत्तीसगड आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना कनेक्ट करते. छत्तीसगड ते महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या दरम्यान ही जगातील सर्वाधिक लांब ट्रेन चालवली जात असून या ट्रेनला आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी जवळपास 11.20 तास एवढा वेळ लागतो.
या ट्रेनला सुपर वासूकी ट्रेन असे म्हणतात. या ट्रेनची लांबी जवळपास साडेतीन किलोमीटर इतकी आहे यामुळे जर ट्रेनच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पायी जायचे असेल तर जवळपास एका तासाचा वेळ लागतो.
मिळालेल्या माहितीनुसार जगातील सर्वाधिक लांबीच्या या सुपर वासुकी ट्रेनला एकूण 295 डब्बे जोडण्यात आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या रेल्वे गाडीला सहा इंजिन सुद्धा जोडण्यात आले आहेत. परंतु ही गाडी मालवाहतूक आहे. ही गाडी जवळपास 27000 टन वजनाचा माल वाहून नेण्यास सक्षम आहे.