महाराष्ट्राला मिळणार एका नव्या रेल्वे मार्गाची भेट ! ‘या’ Railway मार्गासाठी 836.12 कोटी रुपयांची तरतूद, कसा आहे रूट ?

राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्याला लवकरच एक नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाची भेट मिळणार आहे. या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे कल्याण, मुरबाड परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. आता आपण हा रेल्वे मार्ग नेमका कसा राहिल याबाबतची माहिती पाहणार आहोत.

Published on -

Maharashtra Railway : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे राज्याला एक नवा रेल्वे मार्ग मिळणार आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण-मुरबाड हा नवा रेल्वे मार्ग विकसित केला जाणार असून या रेल्वे मार्गाच्या रखडलेल्या प्रकल्पाला आता गती मिळाली आहे.

कारण की या प्रकल्पासाठी आता 836 कोटी रुपयांच्या भरीव निधीची तरतूद करून देण्यात आली आहे. दरम्यान आता आपण याच संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

नव्या रेल्वे मार्गामुळे प्रवाशांना मिळणार दिलासा 

कल्याण ते मुरबाड दरम्यानच्या नव्या रेल्वे मार्गामुळे या भागातील विकासाला चालना मिळणार आहे. या रेल्वे मार्ग प्रकल्पामुळे कल्याण ते मुरबाड हा प्रवास जलद होईल अशी आशा आहे.

खरंतर या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जोरदार पाठपुरावा करण्यात आला होता. भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी या प्रकल्पासाठी पाठपुरावा केला.

त्यांनी 3 फेब्रुवारी 2025 रोजी झालेल्या संसदेच्या अधिवेशनात या रेल्वे मार्ग प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. या रेल्वे मार्ग प्रकल्पातील अडचणी आणि हा मार्ग किती महत्त्वाचा आहे हे खासदार महोदयांनी संसदेत स्पष्ट केले.

याचाच परिणाम म्हणून आता या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध झाला आहे. त्यांनी संसदीय अधिवेशनात केंद्र सरकारकडे या रेल्वे मार्गाचे अडथळे दूर करून काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली होती.

दरम्यान आता खासदार सुरेश म्हात्रे यांच्या या मागणीची केंद्राकडून दखल घेण्यात आली आहे. या रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत केंद्रीय रेल्वे व खाद्य प्रसंस्करण उद्योग राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी मोठी माहिती दिली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री रवनीत सिंह यांनी या प्रकल्पासाठी 836.12 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असं स्पष्ट करत या रेल्वे मार्ग प्रकल्पाला गती मिळाली असल्याचे सांगितले.

या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी आवश्यक निधीची तरतूद करून देण्यात आली असल्याने आता या प्रकल्पासाठीचे भूमी अधिग्रहण लवकरात लवकर सुरू होणार आहे तसेच या प्रकल्पाच्या इतर कामांना सुद्धा लवकरच सुरुवात होणार आहे. आता हा प्रकल्प अंतिम टप्प्यात नेण्याचे नियोजन देखील सुरू करण्यात आले आहे.

कसा असणार प्रकल्प? 

कल्याण मुरबाड रेल्वे मार्ग प्रकल्पाबाबत बोलायचं झालं तर कल्याण येथील आंबिवली येथून या मार्गाची सुरुवात होणार आहे आणि हा मार्ग मुरबाड पर्यंत जाईल. याची लांबी ही जवळपास 28 km इतकी राहणार आहे.

या प्रकल्पामुळे कल्याण मुरबाड परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल अशी आशा आहे. महत्त्वाची बाब अशी की, खासदार बाळ्या मामा यांना पाठवलेल्या पत्रातही याचा उल्लेख करण्यात आला असून, सर्व अडथळे दूर करून हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प वेळेत पूर्ण केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News