महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात तयार होणार नवा रेल्वे मार्ग ! 568 कोटी रुपयांची निविदा मंजूर, कसा असणार रूट ? पहा…

राज्याला लवकरच आणखी एक नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग मिळणार आहे. राज्यातील एका महत्त्वाकांक्षी रेल्वे मार्ग प्रकल्पाचे काम येत्या काही दिवसांनी सुरू होणार असून यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.

Published on -

Maharashtra Railway : भारतात सध्या सर्वत्र रस्त्याचे आणि रेल्वेचे असंख्य प्रकल्प सुरू आहेत. रस्ते आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असून याच प्रयत्नाचा एक भाग म्हणून सध्या देशातील रस्त्यांची कनेक्टिव्हिटी आणि रेल्वेची कनेक्टिव्हिटी फारच सुखकर झाली आहे.

रेल्वे बाबत बोलायचं झालं तर भारतातील रेल्वेचे नेटवर्क हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे नेटवर्क आहे. विशेष बाब म्हणजे आशिया खंडात आपल्या भारताचे रेल्वे नेटवर्क दुसऱ्या क्रमांकाचे आहे. चायना नंतर आशिया खंडात भारतच सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क असणारे राष्ट्र आहे.

नक्कीच ही आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे आणि अजूनही देशात असंख्य नवनवीन रेल्वे मार्ग विकसित केले जात आहे. अशातच आता राज्यासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ही बातमी खानदेशातील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास करणार आहे. कारण की खानदेशात एक नवा रेल्वे मार्ग तयार केला जाणार आहे.

खानदेशातील एका ब्रिटिश कालीन मीटर गेज मार्गाचे ब्रॉडगेज मार्गात रूपांतरित होणार आहे. महाराष्ट्रातील दळणवळण व्यवस्था मजबूत व्हावी याचा विचार करून उत्तर महाराष्ट्रातील पाचोरा-जामनेर रेल्वेमार्ग आता ब्रॉडगेजमध्ये रूपांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती जाणकार लोकांकडून समोर आली आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सध्या हा मार्ग मीटरगेज असून त्याची एकूण लांबी सुमारे 53 किलोमीटर इतकी आहे. हा मार्ग ब्रिटिश काळात बांधण्यात आला होता. ब्रिटिश काळातल्या या ऐतिहासिक मार्गावरून मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक होते मात्र मीटरगेज मार्ग प्रवाशांची वाढती संख्या पाहता अपुरा पडत आहे.

यामुळे हा 53 किलोमीटर लांबीचा मार्ग ब्रॉडगेज व्हायला हवा अशी येथील स्थानिकांची मागणी होती आणि या मागणीसाठी स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्नशील होते. दरम्यान स्थानिकांचा आणि लोकप्रतिनिधींचा हाच पाठपुरावा आता यशस्वी झाला असून हा मार्ग ब्रॉडगेज केला जाणार आहे.

येत्या काही दिवसांनी याच्या कामाला सुद्धा सुरुवात होणार आहे कारण की, अशोका बिल्डकॉन लिमिटेड या कंपनीची या कामासाठी ची निविदा अंतिम करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीने 568.86 कोटी रुपयांची निविदा सादर केली होती आणि आता हीच सर्वात कमी किमतीची निविदा मंजूर करण्यात आली आहे.

या कंपनीकडे या प्रकल्पाच्या कामाची निविदा गेली असल्याने आता या कंपनीच्या माध्यमातून पूल, अंडर ब्रिज, ओव्हर ब्रिज, रस्ते आणि यार्ड यासारख्या सिव्हिल कामांची पूर्तता केली जाणार आहे. महत्त्वाची बाब अशी की या प्रकल्पांतर्गत केले जाणारे हे काम पुढील 30 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट सुद्धा ठेवण्यात आले आहे.

या प्रकल्पाच्या प्रथम टप्प्यात सिव्हिल काम पूर्ण केले जाईल अशी माहिती देण्यात आली आहे. म्हणजेच या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात ट्रॅक टाकणे, विद्युतीकरण आणि सिग्नल यंत्रणा बसवण्याचे काम होणार आहे. हा पाचोरा जामनेर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग प्रकल्प जळगाव जिल्ह्यासाठी फारच महत्त्वाचा आहे, यामुळे जिल्ह्याच्या कृषी उद्योग पर्यटन शिक्षण अशा विविध क्षेत्राला फायदा होणार आहे. प्रामुख्याने जिल्ह्यातील कृषी क्षेत्राला या प्रकल्पाचा सर्वाधिक लाभ होणार असल्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe