Maharashtra Rain : ऑक्टोबरचा दुसरा टप्पा महाराष्ट्रासाठी फायद्याचा ठरणार आहे. या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून हा पाऊस हा रब्बी हंगामासाठी फायद्याचा ठरू शकतो. खरेतर, गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाली आणि यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले.
अनेक भागांमध्ये शेतकऱ्यांच्या जमिनी पार खरडून निघाल्या आहेत. पिकांसमवेतच जमिनीची मातीही वाहून गेली आहे. अशा या स्थितीत शेतकऱ्यांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा आणि भरीव मदत द्या अशी मागणी उपस्थित होत आहे.

अनेक ठिकाणी जास्तीचा पाऊस झाला असल्याने खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे. आता शेतकऱ्यांची सर्व मदार रब्बी हंगामावर राहणार आहे. दरम्यान आता ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच हा पाऊस रब्बी हंगामासाठी लाभदायक ठरू शकतो अशी ही माहिती तज्ञांकडून दिली जात आहे. 15 ऑक्टोबर पासून राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे आणि जवळपास नरक चतुर्दशी पर्यंत पावसाची शक्यता आहे.
ढगाळ हवामानासह भाग बदल तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. आता आपण 15 ऑक्टोबर पासून सुरू होणारा हा पाऊस कोण-कोणत्या जिल्ह्यांमध्ये हजेरी लावणार याचा आढावा घेऊयात.
तारीख | जिल्हे |
15 ऑक्टोबर | चंद्रपूर गडचिरोली अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी जालना बीड लातूर धाराशिव पुणे सातारा सांगली कोल्हापूर |
16 ऑक्टोबर | संभाजीनगर जळगांव धुळे नाशिक अहिल्यानगर अमरावती बुलढाणा अकोला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग |
17 ऑक्टोबर | सोलापूर बुलढाणा धुळे नाशिक सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर संभाजीनगर हिंगोली |
18 ऑक्टोबर | अहिल्यानगर सोलापूर नांदेड लातूर बीड धाराशिव |
19 ऑक्टोबर | नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर नांदेड परभणी अकोला चंद्रपूर गडचिरोली |
20 ऑक्टोबर | नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव सोलापूर नांदेड परभणी अकोला चंद्रपूर गडचिरोली |