अहिल्यानगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापुर, सोलापूर, धाराशिव, लातुर, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता ! ‘या’ तारखेपासून सुरू होणार पावसाचे सत्र

महाराष्ट्रात आजपासून पाच ते सहा दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. तसेच कडाक्याची थंडी देखील अशीच सुरू राहणार आहे. मात्र 27 नोव्हेंबर नंतर राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. राज्यातील जवळपास नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Rain

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीची तीव्रता वाढली असून अशातच आता भारतीय हवामान खात्याने राज्यात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज दिला आहे. यामुळे कडाक्याच्या थंडीची तीव्रता आणखी कमी होणार आहे. आता कुठे राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली होती आणि असे असतानाच राज्यात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

आय एम डी ने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 27 नोव्हेंबर पासून पावसाला सुरुवात होणार आहे. मध्य महाराष्ट्र अन मराठवाडा या विभागात पाऊस हजेरी लावणारा असा अंदाज आयएमडीने दिला आहे. 27 नोव्हेंबर पासून ते पुढील चार दिवस म्हणजेच 30 नोव्हेंबर पर्यंत राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार आहे.

महाराष्ट्रात आजपासून पाच ते सहा दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहील. तसेच कडाक्याची थंडी देखील अशीच सुरू राहणार आहे. मात्र 27 नोव्हेंबर नंतर राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

राज्यातील जवळपास नऊ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार धाराशिव , लातुर , कोल्हापुर , सांगली , सातारा , पुणे , अहमदनगर , नांदेड , सोलापुर या जिल्ह्यांमध्ये 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान ढगाळ हवामान राहील आणि झालाच तर अगदीच किरकोळ स्वरूपाचा पाऊस या जिल्ह्यांमध्ये होणार आहे.

यामुळे या संबंधित नऊ जिल्ह्यांमध्ये थंडीचे प्रमाण देखील कमी होणार आहे. या सदर नऊ जिल्ह्यांमध्ये या काळात थंडीची तीव्रता कमी होईल असे IMD ने सांगितले आहे.

निवृत्त हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांच्या पाठोपाठ ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात दरवर्षी 2 डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान पाऊस पडत असतो.

दरवर्षी या काळात अवकाळी पाऊस हजेरी लावतो आणि यंदाही 1 डिसेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे असे डख यांनी आपल्या नवीन अंदाजात स्पष्ट केले आहे. तुमच्या प्रावांच्या नव्या हवामान अंदाजानुसार राज्यात 29 नोव्हेंबर पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे.

मात्र 29 नोव्हेंबर नंतर राज्यातील हवामानात बदल होईल आणि एक डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान राज्यात पाऊस होणार असा अंदाज आहे. या काळात तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

29 ते 30 नोव्हेंबर दरम्यान तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडेल पुढे हा पाऊस आंध्र प्रदेश कडून आपल्या महाराष्ट्राकडे येईल आणि राज्यात 1 डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान पाऊस हजेरी लावणारा असा अंदाज त्यांनी आपल्या नवीन बुलेटिनमध्ये वर्तवला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe