अहिल्यानगर, नाशिकसहित ‘या’ जिल्ह्यात पावसाची शक्यता ! किती दिवस राहणार अवकाळीचे सावट, हवामान खात्याचा अंदाज पहा….

हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोकणातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाची शक्‍यता आहे. रायगड, पालघर या कोकणातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तास रिमझिम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडील नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्या नगर जिल्ह्यात सुद्धा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Rain

Maharashtra Rain : राज्यातील हवामानात पुन्हा मोठा बदल झालाय, आता ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे, उत्तर पश्चिम भारतात पुढचे 3 दिवस सर्वात कमी किमान तापमान राहील पण कमाल तापमानात जवळपास 3 डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे.

तसेच भारताच्या दोन्ही बाजूला पश्चिम बंगालच्या खाडीत आणि अरबी समुद्रात सायक्लोनिक सर्क्युलेशन होणार आहे. याचाच परिणाम म्हणून भारतातील काही भागांमध्ये कडाक्याची थंडी आणि काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.

भारताच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये या काळात पाऊस आणि हाड गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव येणार आहे. तर दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यातही अनेक ठिकाणी तापमानात घसरण होणार आहे.

त्याचा परिणाम म्हणून राज्यातील काही भागांमध्ये कडाक्याची थंडी अनुभवायला मिळेल. परंतु या कडाक्याच्या थंडीतच राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उत्तर कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस पावसाची शक्यता आहे.

पावसाचा जोर फार अधिक राहणार नाही फक्त किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आगामी 48 तास राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे. केवळ रिमझिम स्वरूपाचा पाऊस राहील यामुळे शेतकऱ्यांनी फार घाबरून जाण्याचे कारण नाही.

हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोकणातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाची शक्‍यता आहे. रायगड, पालघर या कोकणातील उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तास रिमझिम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तसेच मध्य महाराष्ट्रातील उत्तरेकडील नंदुरबार, जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्या नगर जिल्ह्यात सुद्धा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात मात्र हवामान कोरडे राहील आणि थंडीची तीव्रता पाहायला मिळू शकते. अर्थातच उर्वरित राज्यात कोणताही पावसाचा अंदाज नाहीये.

पण कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात आगामी चार दिवस पावसाची शक्यता आहे. म्हणून भारतीय हवामान खात्याने ज्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज दिला आहे तेथील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घेणे अपेक्षित आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe