Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे पावसा संदर्भात. खरंतर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान प्रामुख्याने कोरडे असून आता हळूहळू थंडीची तीव्रता देखील वाढू लागली आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे.
राज्यात आता शेकोट्या पेटू लागल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे जळगाव नंदुरबार या भागात बोचरी थंडी पडत आहे. एकीकडे राज्यात थंडीचे तीव्रता वाढत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा बिघाड झालाय.
कारण की आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज जारी केला असून राज्यातील आठ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
खरे तर सध्या रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. रब्बी हंगामातील हरभरा पीक पेरणी जवळपास पूर्ण झाली आहे मात्र गव्हाची पेरणी काही भागात बाकी आहे. यामुळे या पावसाचा या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी.
पावसाची शक्यता लक्षात घेता आपल्या शेती कामांचे नियोजन योग्य पद्धतीने आखावे असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने राज्यात येत्या तीन दिवसांनी अर्थातच 14 नोव्हेंबर पासून पावसाला सुरुवात होणार असा अंदाज आहे.
14 आणि 15 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार या काळात राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. या काळात राज्यात हलका ते मध्यम पाऊस होणार आहे.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, अन मराठवाडा विभागातील धाराशिव या 8 जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
फक्त 14 आणि 15 तारखेलाच या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मात्र या काळात या सदरील जिल्ह्यांमधील किमान तापमान वाढणार असून थंडीची तीव्रता थोडीशी कमी होऊ शकते असेही हवामान खात्याकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
राज्यात थंडीची चाहूल लागलेली असताना अचानक पुन्हा पावसाचा इशारा दिल्यामुळे आगामी काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच या संबंधीत जिल्ह्यांमधील गारठा देखील थोडासा कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांवर विपरीत परिणाम होऊ शकतो अशी भीती आहे.