मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! मुंबईवरून ‘या’ शहरासाठी उद्यापासून सुरू होणार नवीन रेल्वेगाडी, 20 Railway Station वर थांबणार

उद्या मुंबई येथील वांद्रे टर्मिनस येथून ही नवीन रेल्वे गाडी सुरू होणार असून या गाडीच्या दोन फेऱ्या होणार आहेत. मुंबई ते हिसार दरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे. वांद्रे टर्मिनस ते हीसार अशी एक फेरी आणि हिसार ते वांद्रे टर्मिनस अशी एक फेरी या पद्धतीने एकूण दोन फेऱ्या या गाडीच्या होतील अशी माहिती पश्चिम रेल्वेचे अधिकाऱ्यांकडून हाती आली आहे.

Tejas B Shelar
Published:
Mumbai Railway News

Mumbai Railway News : मुंबईमधील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. पश्चिम रेल्वे उद्यापासून प्रवाशांचे अतिरिक्त गर्दी पाहता विशेष गाड्या चालवणार आहे. उद्या मुंबई येथील वांद्रे टर्मिनस येथून ही नवीन रेल्वे गाडी सुरू होणार असून या गाडीच्या दोन फेऱ्या होणार आहेत.

मुंबई ते हिसार दरम्यान ही गाडी चालवली जाणार आहे. वांद्रे टर्मिनस ते हीसार अशी एक फेरी आणि हिसार ते वांद्रे टर्मिनस अशी एक फेरी या पद्धतीने एकूण दोन फेऱ्या या गाडीच्या होतील अशी माहिती पश्चिम रेल्वेचे अधिकाऱ्यांकडून हाती आली आहे.

दरम्यान आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कसं राहणार वेळापत्रक ?

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 04725 हिस्सार-वांद्रे टर्मिनस सुपरफास्ट स्पेशल हिसारहून सोमवार, 11 नोव्हेंबर 2024 रोजी 05.50 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 07.20 वाजता वांद्रे टर्मिनसला पोहोचणार आहे.

या गाडीची फक्त एक फेरी होणार आहे. तसेच गाडी क्रमांक 04726 वांद्रे टर्मिनस-हिसार सुपरफास्ट स्पेशल ट्रेन वांद्रे टर्मिनस येथून मंगळवार, 12 नोव्हेंबर 2024 रोजी 09.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 11.10 वाजता हिसारला पोहोचणार आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

पश्चिम रेल्वे मार्गावर धावणारी ही विशेष गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा घेणार आहे. या मार्गावरील तब्बल 20 रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबेल अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

ही ट्रेन बोरिवली, वापी, सुरत, भरूच, वडोदरा, गोध्रा, रतलाम, नागदा, भवानी मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर, रिंगास, सीकर, नवलगढ, झुंझुनू, चिरावा, लोहारू आणि सादुलपूर स्थानकावर थांबा घेणार असल्याने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या गाडीचा मोठा फायदा होईल अशी आशा या निमित्ताने व्यक्त होऊ लागली आहे.

या गाडीच्या रचनेबाबत बोलायचं झालं तर या ट्रेनमध्ये एसी 2-टायर, एसी 3-टायर, स्लीपर क्लास आणि सेकंड क्लास जनरल डबे राहणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe