शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी! ‘या’ तारखेपासून पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार

राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असा अंदाज समोर येत आहे. भारतीय हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तर अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश्य स्थिती तयार झाल्याने तिकडून पुन्हा बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत असून यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असा अंदाज आहे.

Tejas B Shelar
Published:
Maharashtra Rain

Maharashtra Rain : राज्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट येत आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील इतरही विभागांमध्ये थंडीची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून यामुळे रब्बी हंगामातील पिकांना दिलासा मिळतोय. अशातच मात्र राज्यातील शेतकऱ्यांची एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

राज्यात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असा अंदाज समोर येत आहे. भारतीय हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तर अरबी समुद्रात चक्रीवादळसदृश्य स्थिती तयार झाल्याने तिकडून पुन्हा बाष्पयुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने येत असून यामुळे राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असा अंदाज आहे.

या वातावरणीय बदलामुळे राज्यातील थंडीची तीव्रता सुद्धा कमी होईल असे म्हटले जात आहे. खरेतर तर राज्यात 15 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान पावसाने दणका दिला होता. या काळात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले.

पण हे पावसाचे सावट दूर झाल्यानंतर महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढली. पण आता कडाक्याच्या थंडीला सुरुवात होत नाही तोच पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आय एम डी मधील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार थंडीचा मुक्काम आता फक्त दोनच दिवस राहील अन त्यानंतर पुन्हा एकदा राज्यातील थंडीचा जोर कमी होणार आहे.

23 नोव्हेंबर पासून राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण होईल अन् काही ठिकाणी पाऊस पण होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की आयएमडीने बंगालच्या उपसागरात बुधवारी कमी दाबाचा पट्टा तयार झाला अशी माहिती दिली आहे.

या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आता साहजिकच थंडीत खंड पडणार आहे. देशातील बहुतांश भाग गारठलेला आहे. मात्र, महाराष्ट्रात परिस्थिती भिन्न होणार आहे. कारण की राज्यात आता बाष्पयुक्त वारे वाहण्यास सुरुवात होत आहे अन म्हणूनचं आपल्याकडे थंडीचा मुक्काम अवघे दोनच दिवस म्हणजे 22 नोव्हेंबरपर्यंतचं राहणार आहे. यानंतर राज्यात ढगाळ हवामान होईल.

23 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान राज्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून 26 नोव्हेंबर पासून राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात किंचित वाढ होईल आणि यामुळे थंडीचे प्रमाण कमी होईल असा एक अंदाज समोर येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe