महाराष्ट्रातील ‘ह्या’ जिल्ह्यातील मंदिर देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांच्या यादीत ! मंदिराच्या कमाईचा आकडा पाहून व्हाल अवाक

भारतात हजारो मंदिर आहेत. देशातील विविध देवी देवतांच्या मंदिरात भाविक मोठ्या श्रद्धेने उदारहस्ते दान सुद्धा करतात. पण तुम्हाला देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिर कोणते, हे माहिती आहे का? नाही ना मग आज आपण याचबाबत माहिती पाहणार आहोत.

Published on -

Maharashtra Rich Temple : भारतात बहुसंख्य लोक हिंदू धर्माचे पालन करतात. यामुळे देशात हजारो मंदिर अस्तित्वात आहेत. खरे तर हजारो वर्षांपासून भारताची संस्कृती आणि धार्मिक परंपरा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. ही भारत भूमी ब्रम्हा, विष्णू, महेश ह्या त्रिमूर्तींची भूमी आहे. ही भूमी देवी देवतांच्या आणि साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि म्हणूनच इथे देवी-देवतांचे आणि साधुसंतांचे अनेक मंदिर आपल्याला पाहायला मिळतात.

यामुळे जगभरातील हिंदू सनातनी भाविक भारतातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी गर्दी करतात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी श्रीक्षेत्र अयोध्या येथे प्रभू श्री रामरायांचे भव्य असे मंदिर बांधून तयार झाले आणि त्याचा उद्घाटन सोहळा हा फारच नेत्रदीपक राहिला.

अयोध्या येथील श्री रामरायाच्या मंदिराचा उद्घाटन सोहळा संपूर्ण जगाने पाहिला, ग्लोबल मीडियाने या उद्घाटन सोहळ्याला विशेष कव्हरेज दिल. श्रीक्षेत्र अयोध्याप्रमाणेच देशात इतरही अनेक मंदिर धार्मिकदृष्ट्या फारच पवित्र आणि महत्त्वाची आहेत.

दरम्यान अशा मंदिरांमध्ये हिंदू सनातनी भाविक उदारहस्ते दानधर्म करतात. महत्त्वाची बाब म्हणजे मंदिरांमध्ये दिले जाणारे दान दरवर्षी वाढतच आहे. मंदिरांमध्ये दान म्हणून दिल्या जाणाऱ्या रकमेचा आकडा सातत्याने वाढत असून आज आपण भारतातील सर्वाधिक श्रीमंत टॉप 5 मंदिरांची माहिती पाहणार आहोत.

विशेष बाब अशी की या पाच मंदिरांमध्ये आपल्या महाराष्ट्रातीलही एका मंदिराचा समावेश होतो हे विशेष. त्यातल्या त्यात या पाच मंदिरात महाराष्ट्रातील ज्या मंदिराचा समावेश होतो ते मंदिर आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आहे. 

अहिल्यानगर जिल्ह्यातील हे मंदिर देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांच्या यादीत

साईबाबा मंदिर, साईनगरी शिर्डी : भारतातील पाच सर्वाधिक श्रीमंत मंदिरांच्या यादीत महाराष्ट्रातील या एकमेव मंदिराचा समावेश होतो. साईनगरी शिर्डीत येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. दरवर्षी शिर्डीत लाखो भाविक येतात आणि उदार हस्ते दानधर्म करतात.

एका आकडेवारीनुसार श्री क्षेत्र शिर्डी येथील साईबाबांच्या मंदिराला दरवर्षी 400 कोटी रुपयांची देणगी मिळते. देश-विदेशातील भाविक या मंदिरात दानधर्म करतात. या मंदिरात भाविक रोख रकमेव्यतिरिक्त सोने-चांदी, हिरे अशा मौल्यवान वस्तू सुद्धा दान करतात. सध्या साईबाबा मंदिराची एकूण मालमत्ता 1800 कोटी रुपये एवढी असल्याची माहिती समोर आली आहे.

या मंदिरांनाही मिळते करोडो रुपयांचे दान

वैष्णोदेवी मंदिर : या मंदिराचे वार्षिक उत्पन्न हे 500 कोटी रुपये इतके असून हे देशातील श्रीमंत मंदिराच्या यादीत येते. जम्मू काश्मीरमधील या मंदिरात दरवर्षी लाखो लोक दर्शनासाठी येतात. या मंदिरात दरवर्षी एक कोटी भाविक माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी हजेरी लावतात. देशातील सर्वात प्रमुख शक्तीपिठांपैकी एक शक्तीपीठ म्हणून या मंदिराची ओळख आहे. श्री वैष्णोदेवी ट्रस्टची एकूण मालमत्ता ही 500 कोटी रुपयांची आहे.

सुवर्ण मंदिर पंजाब : पंजाब राज्यातील अमृतसर येथील सुवर्ण मंदिर हे शीख बांधवांचे सर्वात पवित्र धार्मिक स्थळ आहे. या ठिकाणी दररोज लाखो लोक दर्शनासाठी गर्दी करतात. या मंदिराचे वार्षिक उत्पन्न सुद्धा 500 कोटी रुपये एवढे असून हे सुद्धा देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांच्या यादीत येते.

तिरुमाला तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर, आंध्र प्रदेश : आंध्रप्रदेश राज्यातील तिरुपती बालाजी हे मंदिर देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांच्या यादीत शीर्षस्थानी आहे. हे पवित्र मंदिर देशातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांच्या यादीत दुसऱ्या स्थानी विराजमान आहे. तिरुपती बालाजी मंदिराला दरवर्षी चौदाशे ते सोळाशे कोटी रुपयांची देणगी मिळते.

या मंदिराची एकूण मालमत्ता अडीच लाख कोटी रुपये इतकी आहे. यामध्ये रोख रक्कम, सोने, दागिने तसेच स्थावर मालमत्तेचा सुद्धा समावेश आहे. या मंदिरात भाविक उदारहस्ते दानधर्म करतात आणि या मंदिरात गेल्यानंतर भाविक आपले केस सुद्धा अर्पण करतात.

पद्मनाभस्वामी मंदिर, केरळ : हे मंदिर जगातील सर्वाधिक श्रीमंत मंदिरांच्या यादीत येते. या मंदिराला आपण भारतातील सर्वाधिक श्रीमंत मंदिर असं म्हणू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार या मंदिराची एकूण मालमत्ता एक लाख वीस हजार कोटी रुपये इतकी आहे.

हे मंदिर भगवान विष्णूचे अवतार पद्मनाभ स्वामी यांना समर्पित आहे. या ठिकाणी दरवर्षी लाखो लोक दर्शनासाठी गर्दी करतात. असं सांगितलं जातं की, या मंदिराच्या खाली एक गुप्त तिजोरी आहे, ज्यात सोने, हिरे, रत्ने, मौल्यवान मूर्ती आणि दागिने सापडले आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News