महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या शहरात तयार होणार 66 किलोमीटर लांबीचा नवा रिंगरोड ! जमीन मालकांना मिळणार पाचपट मोबदला

Published on -

Maharashtra Ring Road : मुंबई पुणे नाशिक ही महाराष्ट्राच्या सुवर्ण त्रिकोणातील तीन महत्त्वाची शहरे. या शहरांवरून राज्याच्या विकासाची मोजणी होते असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे. ही शहरे वेगाने विकसित होत आहेत. मात्र मुंबई पुण्याच्या तुलनेत नाशिकचा विकास थोडा स्लो होत आहे.

पण नाशिकला लाभलेलं धार्मिक महत्त्व पाहता आता कुंभनगरीचं रुपडं पालटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खरंतर मुंबई पुण्याप्रमाणेच आता नाशिक मध्येही मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जाणवू लागली आहे. यामुळे पुण्यानंतर आता नाशिक मध्ये ही रिंग रोड तयार करण्यात येणार आहे.

आगामी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात 66.15 किलोमीटर लांबीचा नवा रिंग रोड तयार करण्यात येणार आहे. दरम्यान या रिंग रोड प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या जमिनीच्या भूसंपादनाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

नासिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित करण्यात आलेल्या रिंग रोड साठी जमीन मालकांना पाचपट मोबदला देण्यात येणार आहे. यामध्ये शहरातील जमीन मालकांना अडीच पट आणि ग्रामीण भागातील जमीन मालकांना पाचपट मोबदला मिळणार असे सांगितले गेले आहे.

50 किलोमीटर लांबीच्या रिंग रोड साठी आवश्यक जमीन जमीन मालकांकडून थेट खरेदी केली जाणार आहे तर उर्वरित 16.15 किलोमीटर लांबीच्या रिंग रोड साठी आवश्यक असणारी जमीन डीपी रोड असल्याने एमआरटीपी अंतर्गत संपादित केली जाणार आहे.

या प्रकल्पासाठी नुकतीच मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक झाली होती. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या बैठकीनंतर भूसंपादनासाठी तातडीने शासन आदेश काढण्यात आले आहेत.

दरम्यान या प्रकल्पासाठीच्या जमीन संपादनाचा खर्च हा सिंहस्थासाठी मंजूर झालेल्या खर्चातून भागवला जाणार असून बांधकामासाठी लागणारा खर्च हा केंद्र सरकार करणार आहे. भूसंपादनासाठी जवळपास 3660 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे तर दुसरीकडे बांधकामासाठी 4263 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

महत्वाची बाब म्हणजे या प्रकल्पासाठी भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे. यामुळे नाशिक मधील रिंग रोड प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल अशी अशा व्यक्त करण्यात आली आहे.

प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीचे संपादन झाल्यानंतर लगेचच बांधकामाची निविदा काढली जाईल आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली की प्रत्यक्षात वर्कऑर्डर देऊन तात्काळ रिंग रोडचे काम सुरू करण्यात येणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News