ब्रेकिंग : पुण्यानंतर महाराष्ट्रातील ‘या’ मोठ्या शहरात तयार होणार रिंग रोड, एप्रिलमध्ये सुरु होणार काम, कसा असणार Ring Road चा रूट ? पहा…

मुंबई जवळील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबईत रिंग रोड प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला असून आता याच प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. मीडिया रिपोर्ट नुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य सरकारला रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने दहा हजार कोटी रुपयांचे, नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट कंपनीकडून 3000 कोटी रुपयांचे आणि इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेडने या प्रकल्पासाठी 3000 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे मान्य केले आहे.

Published on -

Maharashtra Ring Road News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघावा यासाठी पुणे रिंग रोड प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या प्रकल्पाचे काम पूर्ण केले जाणार आहे. दरम्यान पुण्याप्रमाणेचं मुंबईत सुद्धा रिंग रोड तयार होणार आहे. यामुळे मुंबईमधील वाहतूक कोंडी देखील बऱ्यापैकी नियंत्रणात येईल असा विश्वास व्यक्त होतोय.

मुंबई जवळील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मुंबईत रिंग रोड प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला असून आता याच प्रकल्पाबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या प्रकल्पासाठी काही कंपन्यांनी कर्ज देण्यास उत्सुकता दाखवली आहे.

काही बड्या कंपन्या या प्रकल्पासाठी 21500 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यास तयार असल्याची माहिती हाती आली आहे. मीडिया रिपोर्ट नुसार महाराष्ट्र राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य सरकारला रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने दहा हजार कोटी रुपयांचे, नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट कंपनीकडून 3000 कोटी रुपयांचे आणि इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमिटेडने या प्रकल्पासाठी 3000 कोटी रुपयांचे कर्ज देण्याचे मान्य केले आहे.

मात्र याबाबत कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही. पण रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने सध्या प्रसार माध्यमांमध्ये जे वृत्त झळकत आहे त्याला दुजोरा दिला आहे. यामुळे या प्रकल्पाच्या कामाला आता गती मिळणार अशी आशा व्यक्त होऊ लागली आहे. मात्र या प्रकल्पासाठी दिले जाणारे कर्ज हे टप्प्याटप्प्याने वितरित केले जाणार अशी शक्यता असून या प्रकल्पाचे काम पुढील वर्षी सुरु होणार आहे.

एप्रिल 2026 मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू होणार असा अंदाज वर्तवला जातोय. एवढेच नाही तर या प्रकल्पासाठी देशातील अनेक बँका देखील कर्ज पुरवठा करणार आहेत. मात्र कर्ज पुरवठ्याबाबत अजून सरकारकडून कोणतीचं माहिती समोर आलेली नाही. दरम्यान आता आपण मुंबई रिंग रोड प्रकल्प नेमका कसा राहणार याचा एक आढावा घेणार आहोत.

कसा असणार मुंबईचा रिंग रोड प्रकल्प?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्र राज्याची राज्य राजधानी मुंबईला ट्रॅफिक जाममधून कायमची मुक्ती मिळावी यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थातच एमएमआरडीएने 58 हजार 517 कोटी रुपयांच्या योजनेला मंजुरी दिलेली आहे.

दरम्यान ही योजना पूर्ण झाल्यानंतर राजधानी मुंबई केवळ वाहतूक कोंडीतून बाहेर येणार नाही तर मुंबईचा चेहरामोहरा सुद्धा पूर्णपणे बदलणार आहे. दरम्यान या योजनेअंतर्गत मुंबईत 90 किलोमीटरचं रस्त्यांचं जाळं तयार केलं जाणार आहे. यात उड्डाणपूल, महामार्ग आणि अनेक भूयारी मार्गांचा सुद्धा समावेश असणार आहे. या प्रकल्प अंतर्गत मुंबई व उपनगरांमध्ये सात आऊटर आणि इनर रिंग रोड बनवले जाणार आहेत.

हे सातही रिंग रोड तयार झाल्यानंतर मुंबईकर एका तासाच्या आत शहर व उपनगरातील कोणत्याही ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचू शकतील असा विश्वास व्यक्त केला जातोय. तसेच, यासह मुंबईचा पूर्व व पश्चिम भाग सुद्धा अनेक रस्त्यांनी जोडला जाणार आहे. नक्कीच मुंबईमधील हा प्रकल्प शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एक गेम चेंजर प्रकल्प ठरणार आहे यात शंकाच नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe