Maharashtra Ring Road : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात विविध रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. राज्यात अजूनही अनेक रस्ते विकासाच्या प्रकल्पांची कामे सुरू आहेत. अशाच आता उपराजधानी नागपूरमधील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
खरंतर, अलीकडील काही वर्षांमध्ये उपराजधानी नागपूरचा विस्तार फारच जलद गतीने झालाय. यामुळे मुंबई पुणे प्रमाणेच नागपूरमध्ये देखील अलीकडील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे.

वाहतूक कोंडीमुळे नागपूर मधील जनतेला देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. विशेष म्हणजे शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवणे हेतू नागपूरला आतापर्यंत दोन रिंग रोडची भेट मिळाली आहे.
दरम्यान आता शहराला तिसरा रिंग रोड मिळणार आहे. शहराला लागूनचं दुसरा रिंग रोड विकसित करण्यात आला आहे आणि आता तिसऱ्या रिंग रोड साठी जागा आरक्षित करण्यात येणार आहे.
याची अधिसूचना देखील नुकतीच निर्गमित करण्यात आली आहे. हा नागपुरमधील तिसरा रिंग रोड जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील छत्तीस गावांमधून जाणार आहे. आता आपण हा तिसरा रिंग रोड प्रकल्प नेमका कसा असणार याबाबत माहिती जाणून घेऊयात.
कसा असणार नागपूर मधील तिसरा रिंग रोड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारातून नागपूरला तिसऱ्या रिंग रोडची भेट मिळणार आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एनएमआरडीए) आयुक्त संजय मीना यांनी या संदर्भातील अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध केली आहे.
नागपूर मधील रिंग रोड नागपूर ग्रामीण, सावनेर, कळमेश्वर, पारशिवनी, मौदा आणि कामठी तालुक्यातून प्रस्तावित करण्यात आला आहे. या संबंधित तालुक्यांमधील 36 गावांच्या हद्दीनमधून हा रिंग रोड जाणार आहे.
यासाठी 880 हेक्टर आर जमीन आरक्षित केली जाणार आहे. या संदर्भातील प्रस्ताव तयार करण्यात आला असून लवकरच तो प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी सादर होईल.
या गावांमधून जाणार नवा रिंग रोड
नागपूर ग्रामीण – मोहगाव (खुर्द), भुयारी
कळमेश्वर – बोरगाव (खुर्द), बेलोरी
सावनेर – सिल्लोरी, इटनगोटी, बेलोरी (खुर्द), पाटणसावंगी, कवडस, इसापूर, वलनी
कामठी – तांडुळवाणी, उदगाव, भोवरी
पारशिवनी – पारडी -9. इटगाव, तामसवाडी, गुंडरी (वाढे), सोनेगाव, गंरडा, वाघोडा, घाट रोहना, एसांबा, वराडा, चांपा, टेकाडी (गोडेगाव), बोरडा (गणेशी), बोरी (राणी) 16, खेडी, बोरी सिंगोरी, सिंगारदीप, निलज,
मौदा – खोपडी, सालवा