विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्यात पण शिक्षकांची सुट्टी लांबली ! आता ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रातील शिक्षकांना उन्हाळी सुट्टी

महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. 25 तारखेला पेपर झाल्यानंतर लगेचच त्यांना सुट्टी लागली. पण, राज्यातील शिक्षकांची यंदाची उन्हाळी सुट्टी चांगलीच लांबतांना दिसत आहे. दरम्यान, आता शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांबाबत एक महत्त्वाचे अपडेट हाती आले आहे.

Published on -

Maharashtra School : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या चालू शैक्षणिक वर्षातील म्हणजेच 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अंतिम सत्राच्या परीक्षा नुकत्याच संपन्न झाल्या असून परीक्षा झाल्याबरोबर विद्यार्थ्यांना सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा विद्यार्थ्यांना नेहमीपेक्षा उशिराने उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत.

25 तारखेला शालेय विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर होता आणि 26 एप्रिल 2025 पासून शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या असून आता सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे आहे. विद्यार्थी तसेच त्यांचे पालक आता निकालाची वाट पाहत आहेत. शालेय विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राचा निकाल एक मे 2025 रोजी जाहीर केला जाणार आहे.

यामुळे सध्या शिक्षक विद्यार्थ्यांचे पेपर तपासणी मध्ये गुंग आहेत आणि निकालाची तयारी सुरू आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच उरकल्या जात असत. यंदा मात्र ही पद्धत बंद झाली. खरे तर प्रत्येक शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना 220 दिवस अध्यापन होणे अतिशय आवश्यक आहे.

याबाबत जाणकार लोकांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार एका शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे दिवस वगळून किमान 800 तास अध्यापन झाले पाहिजे. तसेच इयत्ता सहावीच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांना जवळपास एक हजार तास अध्यापन होणे आवश्यक असून असा नियमच आहे.

हेच कारण आहे की यावेळी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने शालेय विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्र परीक्षा पुढे ढकलल्या होत्या. शैक्षणिक वर्षात शालेय विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू झाल्या होत्या. विद्यार्थ्यांचा शेवटचा पेपर हा 25 एप्रिलला होता आणि 26 एप्रिल पासून मग त्यांना उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली.

आता त्यांचा निकाल एक मे रोजी लागणार आहे. दुसरीकडे या वर्षी शिक्षकांची उन्हाळी सुट्टी सुद्धा लांबलेली आहे. खरंतर एक मे 2025 रोजी विद्यार्थ्यांचा अंतिम सत्राचा निकाल जाहीर होणार आहे यामुळे दोन मे पासून शिक्षकांना सुट्टी लागणार असा अंदाज होता मात्र यावर्षी दोन मेपासून लगेचच शिक्षकांना सुट्टी लागणार नसल्याचे बोलले जात आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार यावर्षी शिक्षकांची सुट्टी जवळपास चार दिवस लांबलेली आहे. निकाल लागल्यानंतर सुद्धा शिक्षकांना पुढील चार दिवस शाळेत जावे लागणार आहे. म्हणजेच राज्यातील शिक्षकांची उन्हाळी सुट्टी पाच मे 2025 पासून सुरू होणार आहे. शालेय शिक्षण विभागातील शिक्षण अधिकाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चालू शैक्षणिक वर्षातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या आहेत.

तसेच पुढील महिन्याचे शिक्षकांना सुट्ट्या लागणार आहेत, शिक्षकांना 5 मेपासून उन्हाळी सुट्या जाहीर केल्या जातील. तसेच नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात यावर्षी 15 जून पासून होणार नाही तर 16 जून पासून होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष अर्थातच 2025-26 या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 16 जून 2025 पासून होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News