Maharashtra Schools : नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम या लोकप्रिय पर्यटन स्थळांवर भ्याड हल्ला करण्यात आला. यामध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारून 27 लोकांना ठार मारले. त्यामुळे सबंध भारतात पाकिस्तान आणि पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटनांच्या विरोधात तीव्र संतापाची लाट उसळली.
संपूर्ण जगात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि भारताने याच घटनेचा बदला म्हणून पाकिस्तान आणि पीओकेतील दहशतवादी अड्ड्यांवर जोरदार हल्ला चढवला आणि अनेक दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डयावर कारवाई केली. यामुळे सध्या दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच बिघडले आहेत आणि अगदीच युद्धाचे सावट पाहायला मिळत आहे. अशी सारी तणावाची परिस्थिती असतानाच सध्या देशभरातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे.
खरे तर, भारत आणि पाकिस्तान यांच्यात असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही तासात सोशल मीडियावर एक मेसेज वेगाने व्हायरल होत आहे. या मेसेज मध्ये एक नोटीस सुद्धा आहे. या नोटीसमध्ये देशात युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असल्याचा दावा करत सर्व परीक्षा रद्द झाल्याचे सांगण्यात आले आहे.
यामुळे संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांमध्ये फारच संभ्रमाची स्थिती निर्माण झाली असून विद्यार्थी आणि पालक चिंतेत आले आहेत. मात्र आता याच संदर्भात युजीसी कडून मोठे स्पष्टीकरण समोर आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण खरंच भारत आणि पाकिस्तान यांच्यात असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत का? याबाबतची माहिती पाहणार आहोत.
UGC ने काय सांगितलं?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असणाऱ्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे देशातील सर्व प्रकारच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत आणि यामुळे विद्यार्थ्यांना तातडीने घरी परतण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मात्र सोशल मीडिया मधील या मेसेजमुळे अनेक विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. आता याच सगळ्या पार्श्वभूमीवर यूजीसी कडून अर्थातच विद्यापीठ अनुदान आयोगाकडून तात्काळ स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
आयोगाने सांगितल्याप्रमाणे सध्या सोशल मीडियामध्ये जी नोटीस वायरल होत आहे ती पूर्णपणे बनावट आहे. UGC ने त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून एक पोस्ट शेअर करत या प्रकरणात स्पष्टीकरण दिले आहे.
यूजीसीने असे सांगितले आहे की, UGC च्या नावाने परीक्षा रद्द झाल्याची जी नोटीस व्हायरल होत आहे ती पूर्णपणे खोटी आणि निरर्थक आहे. यूजीसीने अशी कोणतीही घोषणा आम्ही केलेली नाही.
वेळापत्रकानुसारच परीक्षा होणार
तसेच, यावेळी UGC ने विद्यार्थ्यांना असे आवाहन केले की, विद्यार्थ्यांनी यूजीसीच्या अधिकृत वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडल्सवरच विश्वास ठेवावा. अशा सोशल मीडिया मधील मेसेजेसवर विश्वास ठेवू नये.
शिवाय आयोगाकडून असे स्पष्ट करण्यात आले आहे की देशात अशा प्रकारचे अफवा पसरवणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि म्हणूनच अशा प्रकरणांवर कठोर कारवाई केली जाईल. दरम्यान, नियोजित वेळापत्रकानुसार संपूर्ण देशभरात यूजीसीकडून परीक्षा होणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.