Maharashtra Schools : पुढील महिन्यात राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. 15 जून 2025 पासून नवीन शैक्षणिक वर्ष म्हणजेच 2025 – 26 हे नवं शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. खरंतर 2024 25 या शैक्षणिक वर्षाची समाप्ती फारच उशिराने झाली.
यामुळे नवीन शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरू होणार राज्यातील शाळा कधी उघडणार हा मोठा सवाल विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून उपस्थित केला जातो. मात्र महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय विभागाने यंदा सुद्धा 15 जून पासूनच शाळा उघडतील असे जाहीर केले आहे.

दरम्यान असे असतानाच राज्यातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी तसेच पालकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होण्याची शक्यता असून
असे झाल्यास राज्यातील शाळांमधील वेळापत्रक सुद्धा बदलेल असे बोलले जात आहे. दरम्यान आता आपण नवीन शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर शाळांचे वेळापत्रक कसे असेल या संदर्भातील थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस असणार शाळेचे नवीन टाइम टेबल ?
मीडिया रिपोर्टनुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून शाळेचा टाईमिंग हा नऊ ते चार असा राहणार आहे. या नव्या टाईम टेबल नुसार राज्यातील सर्वच्या सर्व शाळा नऊ वाजेला भरतील आणि चार वाजेला सोडल्या जाणार आहेत.
मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवायचे झाले तर याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे. नक्कीच हा निर्णय घेतला गेला तर याचा विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर मोठा परिणाम होणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना 5 च्या आधीच सुट्टी मिळणार आहे.
परिपाठ किती वाजेला होणार ?
मीडिया रिपोर्ट मध्ये जे नवीन टाईम टेबल समोर आले आहे त्या नव्या टाईम टेबल नुसार राज्यातील शाळा आता सकाळी 9:00 वाजता भरतील, त्यानंतर 9:25 पर्यंत परिपाठ होईल, परिपाठ झाल्यानंतर मग लेक्चर सुरू होणार आहेत.
9 वाजून 25 मिनिटांनी लेक्चर सुरू होतील आणि जवळपास अकरा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत पहिल्या तीन तासिका होणार आहेत. त्यानंतर, मग दहा मिनिटांची लहान सुट्टी राहणार आहे. लहान सुट्टी झाली की 11:35 वाजेला शाळा भरेल आणि
त्यानंतर 12:50 पर्यंत दोन तासिका होतील. यानंतर मग जवळपास 40 मिनिटांची मोठी सुट्टी राहणार आहे. मोठी सुट्टी झाली की मग दीड पासून पुन्हा शाळा भरेल आणि 3:55 पर्यंत तासिका होतील. दरम्यान शेवटच्या 5 मिनिटांमध्ये वंदे मातरम घेतले जाईल आणि त्यानंतर मग शाळा सोडली जाईल असे बोलले जात आहे.