Maharashtra Schools : उद्या 25 नोव्हेंबर 2025 रोजी काही राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की, देशातील विविध राज्यांमध्ये स्थानिक परंपरा व सणानिमित्त राज्यानुसार सुट्ट्यांचे वेळापत्रक ठरवले जाते.
आपल्या महाराष्ट्रात गणेशोत्सव, दहीहंडी, नवरात्रोत्सव अशा अनेक उत्सवांना शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते.

त्याचप्रमाणे, शीख समाजाचे नववे गुरु गुरु तेग बहादुर यांच्या शहादत दिनानिमित्त अनेक राज्यांत सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गुरु तेग बहादूर यांच्या शहादत दिनानिमित्त उद्या अनेक राज्यांमधील शाळा आणि कॉलेजेसला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दिल्लीत 25 नोव्हेंबरला अधिकृत सुट्टी जाहीर
दिल्ली सरकारच्या वतीने उद्या 25 नोव्हेंबरला गुरु तेग बहादुर शहीदी दिवसानिमित्त सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे. या संदर्भात दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सामाजिक माध्यमावर ट्विट करत अधिकृत माहिती दिली.
या सुट्टीमुळे सरकारी शाळा, महाविद्यालये, तसेच सर्व शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. परंपरेनुसार पंजाब व हरियाणा राज्यांत या दिवशी दरवर्षी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली जाते.
यावर्षी उत्तर प्रदेश सरकारनेही 25 नोव्हेंबरला सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे या राज्यांतील शिक्षण संस्था व शासकीय कार्यालयांना देखील सुट्टी मिळणार आहे.
गुरु तेग बहादुर यांनी धार्मिक स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. त्यांच्या शहादतीच्या स्मरणार्थ या दिवशी विविध गुरुद्वारांत विशेष कार्यक्रम, कीर्तन आणि सेवा उपक्रम आयोजित केले जातात.
मात्र उद्या आपल्या महाराष्ट्रातील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सुट्टी राहणार नाही. उद्या सुद्धा राज्यातील शाळा आणि कॉलेज नियमितपणे सुरू राहणार आहेत.
25 नोव्हेंबर 2025 रोजी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी राहणार नाही पण काही राज्यांमधील शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना उद्या सुट्टी देण्यात आली आहे.













