महाराष्ट्र राज्यातील ‘या’ शेकडो शाळांना 23 ऑगस्ट 2025 पर्यंत सुट्टी जाहीर ! तुमच्या शाळा सुरू राहणार की बंद ? वाचा…

महाराष्ट्र राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्यातील शेकडो शाळा पुढील दीड महिना बंद राहणार आहेत. दरम्यान आता आपण या शाळा बंद राहण्याचे कारण नेमके काय? याचा आढावा या ठिकाणी घेणार आहोत.

Published on -

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच त्यांच्या शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी अधिक खास ठरणार आहे. ती म्हणजे राज्यातील काही झेडपीच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

या शाळांना तब्बल दीड महिना सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. खरंतर, गेल्या काही दिवसापासून राज्यातील पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढलाय, सातारा जिल्ह्यात सुद्धा यंदा पावसाने फार कहर केला आहे.

विशेषतः जिल्ह्यातील पश्चिम भागातील पाटण, महाबळेश्वर आणि जावली तालुक्यांत पावसाचे अगदीच रौद्ररूप पाहायला मिळत आहे. या तालुक्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याची नोंद करण्यात आली आहे, यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

येथील डोंगराळ भागांमध्ये होणाऱ्या मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाचा धोका सुद्धा निर्माण झाला आहे. दरम्यान, याच साऱ्या पार्श्वभूमीवर आता राज्यातील काही भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

या शाळांना सुट्टी जाहीर

जिल्हा परिषद प्रशासनाने सातारा जिल्ह्यातील पाटण, महाबळेश्वर आणि जावळी या तीन तालुक्यांतील जवळपास 334 झेडपीच्या म्हणजेच प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे. या संबंधित शाळांना एक जुलै 2025 पासून सुट्टी जाहीर करण्यात आली असून 12 ऑगस्टपर्यंत या शाळा आता बंद राहणार आहे.

म्हणजेच दीड महिना या शाळा बंद राहतील. जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील 186, महाबळेश्वरमधील 118 आणि जावळी तालुक्यातील 30 प्राथमिक शाळांना 12 ऑगस्ट 2025 पर्यंत पावसाळी सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

या भागातील शाळा दरवर्षी पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बंद असतात. दरवर्षी येथील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पावसाळी सुट्टी दिली जाते आणि यंदाही या विद्यार्थ्यांना पावसाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. येथील शाळा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बंद असतात म्हणून या विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या दिल्या जात नाहीत. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!