Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावीचा निकाल जाहीर केला. 13 मे 2025 रोजी दहावी बोर्डाचा निकाल जाहीर करण्यात आला असून विद्यार्थी आता पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहे.
दहावीनंतर काही विद्यार्थी पॉलिटेक्निकला ऍडमिशन घेतात, तसेच काही विद्यार्थी आयटीआयला आणि काही विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेतात.

दरम्यान जर तुम्हीही दहावी उत्तीर्ण झाला असाल आणि अकरावीला ऍडमिशन घ्यायचे असेल तर तुमच्यासाठी आजची बातमी कामाची राहणार आहे. कारण की अकरावीच्या प्रवेश प्रक्रिया बाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
कधीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार?
मिळालेल्या माहितीनुसार कालपासून अकरावीच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बुधवार, 21 मेपासून ही प्रक्रिया सुरू झाली असून विद्यार्थ्यांकडे अर्ज भरण्यासाठी एक आठवडा एवढी मुदत राहणार आहे.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा प्रथमच सगळीकडे ऑनलाईन करण्यात आली आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी 28 मे 2025 ही शेवटची तारीख निश्चित करण्यात आले आहे.
28 मेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत राहणार आणि 30 मे रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार अशी माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर मग अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांची फायनल लिस्ट जारी होणार आहे हे फायनल लिस्ट 3 जून रोजी जाहीर होईल.
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात कधी होणार
अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या नव्या शैक्षणिक वर्षाची म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 26 ची सुरुवात 11 ऑगस्ट 2025 पासून होणार आहे. प्राप्त माहिती नुसार महाराष्ट्रात यंदा अकरावीच्या वर्गासाठी 20 लाख 91 हजार 390 जागा उपलब्ध आहेत.
यापैकी सहा लाख 72 हजार 754 जागा कला शाखेसाठी आहेत. कॉमर्स म्हणजेच वाणिज्य शाखेसाठी पाच लाख 48 हजार 316 जागा आहेत. तसेच सायन्स शाखेसाठी यंदा आठ लाख 70 हजार 328 जागा आहेत.
तुमच्या जिल्ह्यात कोणत्या शाखेसाठी किती जागा?
जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात सायन्स आणि कॉमर्स या शाखेसाठी किती जागा उपलब्ध आहेत याची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. https://mahafyjcadmissions.in/landing या संकेतस्थळावर तुम्हाला याबाबतची संपूर्ण माहिती उपलब्ध होईल.
खरे तर, राज्यात यंदा प्रथमच संपूर्ण ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे आणि यामुळे यंदा क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश दिले जाणार नाहीत. दरम्यान अकरावी साठी प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांनी https://mahafyjcadmissions.in/landing या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
यंदा प्रवेशासाठी केवळ 100 रुपये शुल्क लागणार असून, प्रवेश प्रक्रियेत जात व प्रवर्गनिहाय आरक्षणाचे पालन अनिवार्य राहणार अशी माहिती संबंधितांकडून प्राप्त झाली आहे. जर विद्यार्थ्यांना अर्ज भरताना अडचण आल्यास 8530955564 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधता येईल.
यंदा अकरावीचा ऑनलाईन प्रवेश अर्ज दोन टप्प्यात भरावा लागणार आहे यातील पहिल्या भागात वैयक्तिक माहिती भरली जाईल आणि दुसऱ्या भागात महाविद्यालयांचा पसंती क्रम निवडायचा आहे.
एक विद्यार्थी जास्तीत जास्त दहा कॉलेजेस पसंती क्रमानुसार निवडू शकतो. प्रत्येक प्रवेश फेरीत ज्या विद्यार्थ्यांना पसंती क्रमानुसार प्रवेश मिळणार नाही त्यांना पुन्हा पसंतीक्रम बदलावा लागणार आहे.