Maharashtra Schools : राज्यातील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) नाशिक यांच्यामार्फत 27 जून 2025 रोजी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.
या परिपत्रकात शैक्षणिक वर्ष 2025 26 मधील सुट्ट्यांची सविस्तर यादी देण्यात आली आहे. या परिपत्रकात सांगितल्याप्रमाणे यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे प्रथम सत्र 16 / 6 / 2025 ते 16 / 10 / 2025 या काळात आयोजित केले जाणार आहे.

तसेच यंदाच्या शैक्षणिक वर्षाचे द्वितीय सत्र 3 / 11 / 2025 ते 1 / 5 / 2026 या काळात आयोजित केले जाणार आहे. तसेच पुढील शैक्षणिक वर्ष म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2026 – 27 सोमवार दिनांक 15 जून 2026 पासून सुरू होणार आहे.
दरम्यान आता आपण शिक्षणाधिकारी माध्यमिक नाशिक यांच्यामार्फत जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार याची माहिती पाहणार आहोत.
शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मधील सुट्ट्यांची यादी खालील प्रमाणे
या शैक्षणिक वर्षात माननीय विभागीय आयुक्त यांच्या अधिकारात तीन सुट्ट्या राहतील. मुख्याध्यापक यांच्या अधिकारात तीन सुट्ट्या राहतील. तसेच दिवाळीची सुट्टी 17 ऑक्टोबर 2025 ते एक नोव्हेंबर 2025 या काळात राहणार आहे. रविवार वगळता दिवाळीच्या सुट्ट्या 13 दिवस राहतील. तसेच उन्हाळी सुट्टी दोन मे 2026 ते 13 जून 2026 या काळात राहणार आहे.
रविवार वगळता उन्हाळी सुट्ट्या 37 दिवस राहतील. आता आपण या चालू शैक्षणिक वर्षात रविवार वगळता कोणकोणत्या तारखांना माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना सुट्ट्या राहणार याची यादी पाहुयात.
9 ऑगस्ट 2025 : रक्षाबंधन
15 ऑगस्ट 2025 : स्वातंत्र्य दिन
27 ऑगस्ट 2025 : गणेश चतुर्थी
पाच सप्टेंबर 2025 : ईद-ए-मिलाद
6 सप्टेंबर 2025 : अनंत चतुर्दशी
22 सप्टेंबर 2025 : घटस्थापना
2 ऑक्टोबर 2025 : महात्मा गांधी जयंती / दसरा
5 ऑक्टोबर 2025 : गुरुनानक जयंती
25 डिसेंबर 2025 : ख्रिसमस
14 जानेवारी 2026 : मकर संक्रांत
26 जानेवारी 2026 : प्रजासत्ताक दिन
19 फेब्रुवारी 2026 : छत्रपती शिवाजी महाराज जयंती
4 मार्च 2026 : धुलीवंदन
19 मार्च 2026 : गुढीपाडवा
21 मार्च 2026 : रमजान ईद ( ईद-उल-फितर)
26 मार्च 2026 : रामनवमी
31 मार्च 2026 : महावीर जयंती
3 एप्रिल 2026 : गुड फ्रायडे
14 एप्रिल 2026 : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती
एक मे 2026 : महाराष्ट्र दिन /बुद्ध पौर्णिमा
दिवाळी व उन्हाळी सुट्टीत येणारे सण
21 ऑक्टोबर 2025 : दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन)
22 ऑक्टोबर 2025 : दिवाळी (बलिप्रतिपदा)
23 ऑक्टोबर 2025 : भाऊबीज
27 मे 2026 (उन्हाळी सुट्टी) : बकरी ईद
रविवारी येणारे सण कोणते
सहा जुलै 2025 : मोहरम / आषाढी एकादशी
शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मधील सुट्ट्यांची यादीचे PDF पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मधील सुट्ट्यांची यादी
