दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ दिवशी मिळणार हॉल तिकीट

Published on -

Maharashtra Schools : इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. ही बातमी महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी खास ठरणार आहे.

खरे तर महाराष्ट्र राज्य बोर्डाने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या दोन्ही वर्गांच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक गेल्या महिन्यात समोर आले होते.

दरम्यान आता बारावीच्या विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट अर्थातच प्रवेश पत्र बाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मिळालेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट मिळणार आहेत.

बोर्डाच्या माध्यमातून फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे येत्या सोमवारपासून अर्थात 12 जानेवारी 2026 पासून उपलब्ध होणार आहेत. राज्य मंडळाचे सचिव डॉक्टर दीपक माळी यांनी एका प्रकटनाद्वारे या संदर्भातील सविस्तर माहिती दिली आहे.

माळी यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना बारावीच्या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

संबंधित शाळा आणि महाविद्यालयांना बारावी वर्गातील विद्यार्थ्यांचे बारावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.

यानुसार आता महाराष्ट्र राज्य बोर्ड अंतर्गत येणाऱ्या सर्व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावी बोर्डाच्या परीक्षेची ऑनलाईन प्रवेश पत्राची कॉपी विद्यार्थ्यांना द्यायची आहे.

प्रवेश पत्राच्या छायांकित प्रत काढून त्यावर मुख्याध्यापककांना शिक्का आणि स्वाक्षरी करणे अनिवार्य राहणार आहे. दरम्यान विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देताना त्यांच्याकडून कोणतेच अतिरिक्त शुल्क वसूल केले जाणार नसल्याचे स्पष्टीकरण बोर्डाकडून देण्यात आले आहे.

जर समजा हॉल तिकीटवर असणारे छायाचित्र सदोष असेल तर विद्यार्थ्यांचा पासपोर्ट फोटो हॉल तिकीट वर चिकटून त्यावर मुख्याध्यापकाचा किंवा प्राचार्याचा सही व शिका घ्यायचा आहे.

दरम्यान जर विद्यार्थ्यांकडून हॉल तिकीट गहाळ झाले किंवा हरवले तर अशावेळी सदर विद्यार्थ्याला शाळे कडून पुनश्च हॉल तिकीट देण्यात येणार असून अशा हॉल तिकीट द्वितीय प्रत असा उल्लेख केला जाणार आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News