महाराष्ट्रातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! समोर आली मोठी अपडेट

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या पगारवाढीच्या संदर्भात एक नवीन माहिती समोर आलीये. येत्या काही महिन्यांनी राज्यातील शिक्षकांना पगारवाढीचा लाभ मिळणार आहे.

Published on -

Maharashtra Schools : महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर सध्या शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्या सुरू आहेत. येत्या काही दिवसांनी शिक्षक पुन्हा एकदा कामावर रुजू होतील. यावर्षी शिक्षकांना दोन जून नंतर प्रशिक्षणासाठी हजर राहावे लागणार आहे अर्थातच शिक्षकांना फक्त दोन जून 2025 पर्यंतच उन्हाळी सुट्ट्या राहतील.

दरम्यान शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर 15 जून 2025 पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होणार आहे. 2025 – 26 या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून पासून होईल आणि 16 जून पासून विद्यार्थ्यांचे वर्ग भरतील. अशातच आता राज्यातील शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे त्यांच्या पगार वाढीच्या संदर्भात. अशा परिस्थितीत आता आपण शिक्षकांच्या पगारवाढीच्या संदर्भातील बातमी सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

महाराष्ट्रातील शिक्षकांचा पगार वाढणार

खरे तर केंद्रातील मोदी सरकारने 16 जानेवारी 2025 रोजी एक ऐतिहासिक निर्णय घेत केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नव्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. नव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता मिळाली असल्याने ते काही दिवसांनी नवीन वेतन आयोगाची स्थापना होणार आहे आणि या नव्या आयोगाच्या समितीच्या माध्यमातून आगामी काळात आपला अहवाल सरकारकडे सादर केला जाईल

आणि मग एक जानेवारी 2026 पासून नवीन आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना नवा वेतन आयोग लागू झाला की मग महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा नवीन वेतन आयोग लागू होणार आहे. दरम्यान नवीन वेतन आयोगात राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा पगार किती वाढणार ? याच संदर्भातील एक नवीन अपडेट हाती आली आहे.

प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा पगार किती वाढणार?

सध्या राज्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा किमान मूळ पगार हा 29 हजार 200 रुपये इतका आहे मात्र नवीन वेतन आयोग लागू झाल्यानंतर या पगारात पाच हजार रुपयांची वाढ होणार आहे म्हणजेच नव्या वेतन आयोगात प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा पगार 34 हजार दोनशे रुपये एवढा होईल अशी माहिती समोर येत आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचा पगार किती वाढणार?

प्राथमिक शाळेतील शिक्षकांप्रमाणेच माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा पगार सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. आगामी वेतन आयोगात माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा किमान मूळ पगार 40800 होण्याची शक्यता आहे तर उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा पगार पन्नास हजार सातशे रुपये होईल असा दावा केला जात आहे.

तथापि या संदर्भातील अधिकृत माहिती अजूनही हाती आलेले नाही यामुळे प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकांचा पगार खरच एवढा वाढणार का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News