पुढील वर्षी पहिली ते बारावीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! सरकारने घेतला मोठा निर्णय

पुढील वर्षी पहिली ते बारावीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी विद्यार्थ्यांसाठी जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच ती शिक्षकांसाठी आणि पालकांसाठी देखील महत्त्वाची आहे.

Published on -

Maharashtra Schools : राज्यातील पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे.

खरंतर आगामी शैक्षणिक वर्ष हे 15 जून पासून सुरु होणार आहे आणि 16 जून पासून विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू होतील. दरम्यान नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधीच विद्यार्थ्यांसाठी पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार तयार करण्यात आलेल्या नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 26 पासून सुरु होणार आहे.

मात्र या नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी ही टप्प्याटप्प्याने होणार आहे. म्हणजेच एकाच टप्प्यात सर्वच विद्यार्थ्यांसाठी नव्या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होणार नाही.

जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सीबीएसई पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रम तयार करण्यात आले आहेत जे की विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व स्पर्धा परीक्षांची तयारी लक्षात घेऊन विकसित करण्यात आले आहेत.

दरम्यान आता आपण नवीन अभ्यासक्रम कधी आणि कोणत्या वर्गासाठी लागू होणार, याची अंमलबजावणी कशी होणार या संदर्भातील माहिती जाणून घेणार आहोत.

कशी होणार याची अंमलबजावणी ?

संबंधितांकडून प्राप्त माहितीनुसार राज्यात शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून अभ्यासक्रमात बदल केला जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षात म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 26 मध्ये इयत्ता पहिलीचा अभ्यासक्रम नव्याने राबवण्यात येणार आहे.

त्यानंतरच्या वर्षात म्हणजे 2026 – 27 मध्ये दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीचा अभ्यासक्रम बदलणार आहे. त्यानंतरच्या वर्षात म्हणजे 2027-28 मध्ये पाचवी, सातवी, नववी आणि अकरावीचा अभ्यासक्रम बदलला जाणार असल्याची खात्रीलायक बातमी समोर आली आहे. 

दहावीचा आणि बारावीचा अभ्यासक्रम कधी बदलणार?

नवीन शैक्षणिक धोरणानुसार डिझाईन करण्यात आलेला आठवी दहावी आणि बारावीचा नवीन अभ्यासक्रम सर्वात शेवटी बदलणार आहे. इयत्ता आठवी, दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम 2028-29 या शैक्षणिक सत्रापासून बदलणार अशी माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे दहावी आणि बारावीचे बोर्ड परीक्षा स्वरूप सध्या जसे आहेत तसेच कायम राहणार असे संकेत मिळत आहेत. स्वतः शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातूनच असे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान या नव्याने लागू होणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये केंद्र सरकारच्या पॅटर्ननुसार पाठ्यपुस्तकांची मांडणी केली जाणार आहे.

त्यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा परीक्षांची तयारी अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल. दरम्यान, राज्य शैक्षणिक आराखडा तयार असून त्यानुसार ही अंमलबजावणी होत असल्याचे सांगितले जात आहे. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News