दिल्ली, उत्तर प्रदेशसह ‘या’ राज्यातील शाळांना 10 ते 15 दिवस सुट्ट्या राहणार ! महाराष्ट्रातील शाळा सुरू राहणार की बंद?

Maharashtra Schools : शालेय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या काही दिवसांपासून तापमानात सातत्याने घट होत आहे तापमानात होणारे घट पाहता थंडीची तीव्रता सुद्धा वाढत आहे.

दिल्ली , उत्तर प्रदेश सारख्या राज्यांमध्ये थंडीची तीव्रता अधिक आहे. जम्मू-काश्मीर राजस्थान आणि पंजाब बाबत बोलायचं झालं तर येथे तापमान थेट मायनसमध्ये गेले आहे.

महाराष्ट्रात देखील काही भागांमध्ये थंडीची लाट आली आहे. विशेषता उत्तर महाराष्ट्रात थंडीचे प्रमाण अधिक पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान 10 च्या आत आले आहे.

दुसरीकडे राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये वायुप्रदूषणाची स्थिती आणखी बिकट झाली आहे. दरवर्षी वाड्याच्या दिवसांमध्ये दिल्लीत वायू प्रदूषण वाढते आणि याही वर्षी येथील वायू प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे आणि यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

दरम्यान थंडीची वाढती तीव्रता आणि वायू प्रदूषण पाहता काही राज्यांमधील शाळांना सलग दहा ते पंधरा दिवस सुट्ट्या जाहीर करण्याचा महत्त्वाचा निर्णय संबंधित राज्यांमधील राज्य सरकारने घेतलेला आहे.

अशा परिस्थितीत आज आपण देशातील कोणत्या राज्यांमधील शाळांना पुढील दहा-पंधरा दिवस सुट्ट्या राहणार आणि आपल्या महाराष्ट्रात पण असा काही निर्णय होण्याची शक्यता आहे का याविषयी सविस्तर माहिती येथे जाणून घेणार आहोत. 

कोणत्या राज्यांमधील शाळांना सुट्ट्या राहणार? 

मिळालेल्या माहितीनुसार पंजाब राज्यातील शाळांना 24 डिसेंबर ते एक जानेवारी या कालावधीत सुट्ट्या राहणार आहेत. त्यानंतर पुढे शनिवार आणि रविवार पण असेल त्यामुळे पंजाब मधील शाळा 5 जानेवारी नंतरच सुरू होण्याची शक्यता आहे. 

उत्तर प्रदेश राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सुट्टी राहणार आहे. गाजियाबाद जिल्ह्यात जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

हरियाणा राज्यातील शाळांना देखील एक जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान सुट्टी राहील अशी माहिती प्रसार माध्यमांमधून समोर येत आहे.

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत वायू प्रदूषणामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. 23 डिसेंबर पासून ते 1 जानेवारीपर्यंत येथील शाळा बंद राहणार आहेत. त्यानंतर परत तीन आणि चार जानेवारीला देखील येथील शाळांना सुट्टी राहणार आहे. दिल्लीसह नोएडा, फरीदाबाद, गुरुग्राम या परिसरातील शाळा देखील बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. 

आपल्या महाराष्ट्र बाबत बोलायचं झालं तर राज्यात थंडीमुळे किंवा वायू प्रदूषणामुळे कोणत्याच भागातील शाळा दहा ते पंधरा दिवसांसाठी बंद राहणार नाहीत.