राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी ! महाराष्ट्र राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्रात सध्या दहावी आणि बारावीच्या निकालाची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्य बोर्डाकडून नुकत्याच काही दिवसांपूर्वी दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला असून निकाल लागल्यापासूनच या निकालाची चर्चा सुरू आहे आणि विद्यार्थी पुढील प्रवेशासाठी लगबग करत आहेत. दरम्यान दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचे अपडेट हाती आले आहे.

Published on -

Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून दहावी आणि बारावीचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेत यावर्षी विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे.

अनेक विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले आहेत. दरम्यान जर तुम्हीही दहावी आणि बारावीची परीक्षा दिली असेल आणि या परीक्षेत उत्तीर्ण झाला असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.

ती म्हणजे दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांना सरकारकडून दहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. परीक्षेत फक्त 50% गुण मिळवलेले असतील तरीसुद्धा शिष्यवृत्ती म्हणून काही विद्यार्थ्यांना सरकारकडून दहा हजार रुपये मिळणार आहेत.

दहावी आणि बारावीचा निकाल कधी लागला?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या माध्यमातून बारावीचा निकाल 5 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला आणि त्यानंतर आठ दिवसांनी म्हणजेच 13 मे 2025 रोजी दहावीचा निकाल जाहीर झाला.

दरम्यान या दोन्ही परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी 50% पेक्षा अधिक गुण मिळवलेले आहेत. दरम्यान, राज्यातील ज्या बांधकाम कामगारांच्या मुलांनी दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 50% पेक्षा अधिक मार्क्स मिळवले आहेत त्यांना सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

कोणाला मिळणार आर्थिक मदत?

खरे तर बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक विशेष शिष्यवृत्ती योजना राबवली जात आहे. या अंतर्गत दहावी आणि बारावी मध्ये 50% पेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. दरम्यान आता आपण याच योजनेची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कशी आहे योजना ?

महाराष्ट्र राज्य सरकारकडून दहावी – बारावी शैक्षणिक आर्थिक सहाय्य या नावाची एक विशेष योजना राबवली जात आहे. या अंतर्गत दहावी आणि बारावी पास आऊट झालेल्या बांधकाम कामगारांच्या मुलांना दहा हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाते. ज्या बांधकाम कामगारांच्या मुलांना दहावी आणि बारावीच्या परीक्षेत 50 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत ते विद्यार्थी या योजनेसाठी पात्र ठरतात.

योजनेसाठीच्या पात्रता काय आहेत?

या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली जाते. महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे नोंदणीकृत सदस्य असणाऱ्या कामगारांच्या मुलांना या अंतर्गत शिष्यवृत्ती मिळते.

दहावी किंवा बारावीत 50 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना या अंतर्गत दहा हजार रुपये दिले जातात. जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे ही शिष्यवृत्ती फक्त बांधकाम कामगारांच्या जास्तीत जास्त 2 मुलांना दिली जाते.

महत्त्वाची बाब म्हणजे या योजनेचा लाभ फक्त आणि फक्त महाराष्ट्र राज्यातील बांधकाम कामगारांच्या मुलांनाच मिळतो. म्हणजेच अर्जदार विद्यार्थी आणि त्यांचे कुटुंब हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News