10वी आणि 12वी च्या निकालाची नवीन तारीख समोर ! बारावीचा निकाल 6 मे 2025 रोजी लागणार, दहावीचा निकाल कधी ? पहा…

30 एप्रिल 2025 रोजी सीआयएससीई मंडळाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर आता राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

Published on -

Maharashtra Schools : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर काल, अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच 30 एप्रिल रोजी सीआयएससीई मंडळाचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे राज्य बोर्डाचा निकाल कधी लागणार ? हा मोठा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित होतोय आणि याच संदर्भात आता एक महत्त्वाची माहिती हाती आली आहे.

दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या निकालाची विद्यार्थ्यांना, पालकांना तसेच शिक्षकांना आतुरता लागली आहे. राज्य बोर्डाने या वर्षी दहावी आणि बारावीचा निकाल लवकरच जाहीर होणार असे म्हटले होते. यामुळे आता मे महिन्याला सुरुवात झाली आहे आणि विद्यार्थ्यांकडून निकालाबाबत सातत्याने विचारणा केली जात आहे.

अशातच आता दहावी आणि बारावीच्या निकालाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी व बारावी परीक्षांचे निकाल मे महिन्यात जाहीर होणार आहेत. खरे तर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये एक बातमी व्हायरल झाली होती

ज्यात बारावीचा निकाल 13 मे च्या दरम्यान आणि दहावीचा निकाल 15 मे च्या दरम्यान लागणार असे म्हटले जात होते. मात्र आता बारावीचा निकाल 6 ते 7 मे दरम्यान, तर दहावीचा निकाल 10 ते 13 मे दरम्यान जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे.

राज्य बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून यावेळी 13 मे च्या आधीच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. म्हणजेच दहावी आणि बारावीच्या निकालासाठी आता अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे.

जाणकार लोक सांगतात की चालू शैक्षणिक वर्षात म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये दहावी आणि बारावी बोर्डाचा पेपर वेळेच्या आधीच झाला. यंदा परीक्षा वेळेआधी झाल्याने निकाल सुद्धा वेळेच्या आधीच लागणार अशी शक्यता असून सध्या निकालाची प्रक्रिया फारच गतिमान आहे.

राज्य बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे यंदा परीक्षेच्या दरम्यानच पेपर तपासणी सुरू करण्यात आली होती. क्रीडा गुण आणि सवलतीचे गुण 21 एप्रिलपूर्वीच प्राप्त झाले आहेत, तसेच प्रात्यक्षिक गुणही ऑनलाइन पद्धतीने वेगाने गोळा झाले आहेत. यामुळे यावेळी लवकर निकाल लागण्याची शक्यता आहे.

दरवर्षी बारावीचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या आसपास लागत असतो. मात्र यावेळी बोर्डाचा पेपर लवकर झाला आणि सोबतच पेपर तपासणीची कामे सुद्धा लवकर झाली आहेत.

कारण म्हणजे यंदा शिक्षकांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला नाही, यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली आहे. राज्य मंडळाने शाळा व महाविद्यालयांकडून वेळोवेळी पाठपुरावा करत काम अगदीच वेगाने पूर्ण केल्याचेही समजते. म्हणूनच मागील वर्षांच्या तुलनेत यंदा दोन्ही वर्गांचे म्हणजेच दहावी आणि बारावीचे निकाल लवकर जाहीर होणार आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News