Maharashtra Schools : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले आहे. वेळापत्रक जाहीर झाल्यापासून आता विद्यार्थी अभ्यासाला लागले आहेत. बोर्ड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांमुळे मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे सोबतच काही विद्यार्थी परीक्षेमुळे थोडे तणावात असल्याचे दिसते.
मात्र विद्यार्थ्यांनी कोणताच ताण तणाव घेऊ नये कारण की यावर्षी दहावीची परीक्षा पास होणे विद्यार्थ्यांसाठी अवघड राहिलेले नाही. विद्यार्थ्यांना जे विषय अवघड वाटतात त्याच विषयांमध्ये त्यांना कमी गुण मिळवूनही पास होता येणे शक्य होणार आहे.

विद्यार्थ्यांना इंग्रजी गणित हे दोन विषय नेहमीच अवघड वाटतात. पण आता राज्य बोर्डाने हे दोन्ही विषय पास होणे अगदीच सोपे करून टाकले आहे. खरेतर, बोर्डाकडून वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे.
तसेच परीक्षा जसजशी जवळ येत आहे तशी विद्यार्थ्यांची चिंता सुद्धा वाढत आहे. पण, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य बोर्डाकडून त्रिभाषा सूत्र लागू करण्यात आले असल्याने आता विद्यार्थ्यांना परीक्षा पास होणे अवघड राहिलेले नाही.
बारावीचे विद्यार्थी सुद्धा यावर्षी सहज परीक्षा पास होऊ शकतात. दरम्यान आता आपण शालेय शिक्षण विभागाकडून स्वीकारण्यात आलेलं त्रिभाषा सूत्र नेमकं कसं आहे ? या सूत्रामुळे विद्यार्थी कसे सहजरीत्या पास होऊ शकतात या संदर्भातील आढावा या लेखातून घेणार आहोत.
बोर्डाच्या परीक्षा कधी सुरू होत आहेत
महाराष्ट्र राज्य बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार यावर्षी बारावी बोर्डाची परीक्षा 10 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. तसेच दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. अर्थात यावर्षी दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा जवळपास दहा ते पंधरा दिवस लवकर सुरू होत आहेत.
दरम्यान बोर्डाची लेखी परीक्षा सुरू होण्याआधी विद्यार्थ्यांची प्रॅक्टिकल परीक्षा घेतली जाईल. यावर्षी राज्य बोर्डाने प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे यंदा परीक्षा फार कठीण होईल, आपण उत्तीर्ण होणार नाहीत असा विचार विद्यार्थ्यांच्या मनात आहे.
परंतु यावर्षी विद्यार्थ्यांना परीक्षा पास होणे फार सोपे राहणार आहे. कारण की जे विषय अवघड वाटतात ते विषय फक्त 25 गुण मिळाले तरी विद्यार्थ्यांना पास केले जाणार आहे. दरम्यान जर विद्यार्थ्यांनी आत्तापासूनच योग्य पद्धतीने वेळापत्रक तयार करून विषयनिहाय अभ्यास सुरू केला तर नक्कीच त्यांना बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळणार आहेत.
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार यावर्षी दहावी बोर्डासाठी त्रिभाषा सूत्र लागू करण्यात आले आहे. या सूत्रानुसार मराठी, हिंदी व इंग्रजी या तीन विषयांत विद्यार्थ्यांना फक्त 105 गुण मिळवायचे आहेत. म्हणजे विद्यार्थ्यांना 300 पैकी 105 गुण मिळवायचे आहेत.
आता त्यातील एक-दोन विषयांना 25 जरी गुण मिळाले आणि तिन्ही पैकी एका विषयाला 55 गुण मिळालेत तरी हे तीनही विषय पास केले जाणार आहे. म्हणजे तिन्ही विषयांचे एकूण गुण 105 झाले तरी तो विद्यार्थी पास होणार आहे.
काही विद्यार्थ्यांना सगळे विषय सोपे जातात पण गणित अवघड वाटतं. यावर्षी त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे कारण की गणित व विज्ञान या दोन विषयाचे एकूण गुण 70 असले तरी तो विद्यार्थी त्या विषयांत उत्तीर्ण होतो.