विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेला शाळांना सुट्ट्या लागणार, शाळा कधी खुलणार? वाचा….

विद्यार्थी पालक आणि शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना उन्हाळी सुट्ट्या कधी लागणार ? याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.

Published on -

Maharashtra Schools : राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर एप्रिलचा दुसरा पंधरवडा नुकताच सुरू झाला आहे. दरम्यान, एप्रिल महिना सुरू झाल्यापासून तापमान मोठ्या प्रमाणात वाढले असून वाढत्या तापमानामुळे शाळेला सुट्ट्या कधी लागणार हा मोठा सवाल नागरिकांकडून उपस्थित होतोय.

दरम्यान, आता याच बाबत एक नव अपडेट हाती आल आहे. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना कधी सुट्ट्या लागणार ? तसेच नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा कधी सुरू होणार? याच संदर्भात मोठी माहिती आता आपण जाणून घेणार आहोत.

विद्यार्थ्यांना कधी सुट्ट्या लागणार ?

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, राज्यातील जिल्हा परिषद आणि माध्यमिक शाळांमधील अंतिम सत्र परीक्षा सध्या सुरू आहेत आणि येत्या काही दिवसांनी या परीक्षा संपणार आहे. ८ एप्रिलपासून या परीक्षा सुरू झाल्या आहेत अन २५ एप्रिल रोजी या फायनल एक्झाम संपणार अशी माहिती हाती आली आहे.

दरम्यान अंतिम सत्र परीक्षा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच राज्यातील विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी लागणार आहे. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (SCERT) प्रथमच सर्व शाळांसाठी एकसमान परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला.

यानुसार प्राधिकरणाच्या माध्यमातून वेळापत्रक जाहीर करण्यात आले अन आता ही परीक्षा एप्रिलअखेरपर्यंत सुरु राहणार आहे. वास्तविक पूर्वी अंतिम सत्राच्या परीक्षा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच घेतल्या जात असत. मात्र यंदा तसे काही झाले नाही.

शिक्षण विभागातील संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार शैक्षणिक वर्षात २२० अध्यापन दिवस पूर्ण झाले पाहिजेत अन हीच बाब विचारात घेऊन अन विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही या उद्देशाने यंदाची परीक्षा उशिरा घेण्यात आली आहे.

शिक्षकांना सुट्ट्या कधी लागणार?

विद्यार्थ्यांना सुट्ट्या लागल्यात की शिक्षकांच्या माध्यमातून पेपर तपासणीची कामे पूर्ण केली जाणार आहेत. दरम्यान यावर्षी सालाबादाप्रमाणेच शाळकरी विद्यार्थ्यांच्या अंतिम सत्राचा निकाल १ मे रोजी जाहीर होणार असून त्यानंतर लगेचच शिक्षकांना सुद्धा उन्हाळी सुट्टी जाहीर होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार यावर्षी ३ मेपासून शिक्षकांना उन्हाळी सुट्टीचा लाभ मिळणार असे सांगितले गेले आहे. तसेच रमजान ईदमुळे यंदा उन्हाळी सुट्टी एक दिवस लांबणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.

केव्हा सुरू होणार नवीन शैक्षणिक वर्ष?

नवीन शैक्षणिक वर्षाबाबत बोलायचं झालं तर पुढील शैक्षणिक वर्षाची सुरुवात १५ जूनपासून होणार आहे. दरम्यान, पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना १७ ते ३१ ऑक्टोबरदरम्यान १४ दिवसांची दिवाळी सुट्टी राहणार असल्याचीही माहिती समोर आहे.

एकंदरीत गेल्या अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांकडून आणि पालकांकडून उन्हाळी सुट्ट्या कधी लागणार अशी विचारणा होत होती? दरम्यान आता उन्हाळी सुट्ट्यांचे वेळापत्रक समोर आले असल्याने विद्यार्थ्यांना आणि पालकांना दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe