…..तर ‘या’ शिक्षकांच्या नोकऱ्या जाणार, बीएड झालेल्या शिक्षकांसाठी नवा नियम जाहीर !

बीएड झालेल्या शिक्षकांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या महिन्यात Bed झालेल्या शिक्षकांसाठी नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन कडून नवीन नियम जारी करण्यात आले आहेत.

Published on -

Maharashtra Schools : बीएड झालेल्या शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की 28 जून 2018 रोजी NCTE कडून बीएड झालेल्या शिक्षकांना प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू करण्याचा नवा नियम तयार करण्यात आला.

यानुसार देशातील अनेक राज्यांमध्ये बीएड झालेले उमेदवार प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. मात्र NCTE च्या या धोरणाला पुढे न्यायालयात आव्हान देण्यात आले. दरम्यान माननीय सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात 2023 मध्ये एक महत्त्वाचा निकाल दिला.

खरे तर NCTE च्या 2018 च्या धोरणानुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाने बीएड झालेले जे शिक्षक प्राथमिक शाळेत रुजू झाले आहेत ते प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी परिपूर्ण नाहीत कारण त्यांचे प्रशिक्षण माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी झाले आहे असा निर्वाळा दिला होता.

यामुळे बीएड पदवीधारक जे शिक्षक 2018 नंतर प्राथमिक शाळेत रुजू झाले होते त्यांची नोकरी जाणार की काय असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक होते. मात्र आता याच बाबत एक नवीन अपडेट हाती आली आहे ती म्हणजे या संबंधित शिक्षकांची नोकरी जाणार नाही मात्र त्यांना एक विशेष कोर्स करावा लागणार आहे.

माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काय?

11 ऑगस्ट 2023 ला देवेश शर्मा विरुद्ध भारतीय सरकार यां खटल्यात माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटले होते की, बी.एड पदवीधारक हे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या म्हणजेच इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी पूर्णपणे योग्य नाहीत, कारण त्यांचे प्रशिक्षण हे माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी झाले आहे.

हेच कारण आहे की माननीय सुप्रीम कोर्टाने एनसीटीईला अशा बी.एड धारकांसाठी एक विशेष अभ्यासक्रम म्हणजे ब्रिज कोर्स तयार करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर एनसीटीईने ब्रिज कोर्स तयार केला असून आता हा ब्रिज कोर्स 11 ऑगस्ट 2023 पूर्वी बीएड पदवी प्राप्त प्राथमिक शाळेतील शिक्षकांसाठी बंधनकारक करण्यात आला आहे.

एनसीटीई ने जो ब्रिज कोर्स तयार केला होता त्याला भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने मान्यता दिलेली आहे. दरम्यान शिक्षण मंत्रालयाची मान्यता मिळाल्यानंतर हा ब्रिज कोर्स 7 एप्रिल 2025 रोजीच्या प्रसिद्धी पत्रकानुसार संबंधित शिक्षकांसाठी अनिवार्य करण्यात आला आहे.

कसा आहे ब्रिज कोर्स?

मिळालेल्या माहितीनुसार, 2018 नंतर आणि ऑगस्ट 2023 पूर्वीच्या कालावधीत बीएड झालेले जे उमेदवार प्राथमिक शिक्षक म्हणून रुजू झाले आहेत त्यांच्यासाठी सहा महिन्यांचा ब्रिज कोर्स म्हणजेच प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. हा अभ्यासक्रम सहा महिन्यांचा राहणार आहे परंतु उमेदवारांना तो पूर्ण करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी दिला जाईल.

हा अभ्यासक्रम राष्ट्रीय मुक्त शाळा संस्था (NIOS) द्वारे आयोजित केला जाईल अशी सुद्धा माहिती हाती आली आहे. हा अभ्यासक्रम मुक्त आणि दूरस्थ शिक्षण (ODL) पद्धतीने असू शकतो, जेणेकरून कार्यरत शिक्षक हा कोर्स सहजपणे करू शकतील अशीही माहिती जाणकारांकडून मिळाली आहे.

शिक्षकांची नोकरी धोक्यात येऊ शकते

दरम्यान बीएड झालेले जे शिक्षक 11 ऑगस्ट 2023 पूर्वी प्राथमिक शाळेत रुजू झाले आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स आवश्यक राहणार आहे. हा कोर्स पूर्ण केला नाही तर संबंधित शिक्षकांची नोकरी सुद्धा धोक्यात येण्याची शक्यता आहे. पण हा कोर्स फक्त सध्या सेवेत असणाऱ्या बीएड पदवीप्राप्त प्राथमिक शाळेत शिकवत असणाऱ्या शिक्षकांची नोकरी वाचवणार आहे, हा कोर्स भविष्यात नोकरी मिळवण्यासाठी पात्र राहणार नाही.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News