महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! ‘या’ दोन वर्गातील विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला मिळणार 750 रुपयांची शिष्यवृत्ती 

Published on -

Maharashtra Schools : शालेय विद्यार्थ्यांसाठी सरकारने नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आहे शिष्यवृत्तीबाबत. राज्यातील काही शालेय विद्यार्थ्यांना आता दर महिन्याला 750 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. खरंतर नुकत्याच काही दिवसांपूर्वी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पुन्हा एकदा शिष्यवृत्ती परीक्षेत बदल होईल अशी माहिती दिली होती.

यानुसार आता शालेय शिक्षण विभागाने पाचवी आणि आठवीच्या वर्गातील शिष्यवृत्ती परीक्षा पूर्वीप्रमाणे चौथी आणि सातवीच्या वर्गासाठी घेण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हा बदल या वर्षापासूनच लागू होणार आहे पण यावर्षी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा शिष्यवृत्ती परीक्षा देता येणार आहे.

पण पुढील वर्षापासून मात्र फक्त चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनाच स्कॉलरशिप एक्झाम देता येईल. याशिवाय शिक्षण विभागाने या परीक्षांचे नामकरण सुद्धा करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्तीला प्राथमिक शिष्यवृत्ती असे नाव मिळाले आहे.

तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीला उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती असे नाव देण्यात आले आहे. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा 1954 पासून सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात ही परीक्षा चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी होती.

परंतु 2016 मध्ये सरकारने या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी पाचवी आणि आठवीच्या वर्गांसाठी ही परीक्षा आयोजित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र या निर्णयामुळे या परीक्षेची क्रेझ कमी झाली. अनेक विद्यार्थी ही परीक्षा देत नसल्याचे उघडकीस आले.

परीक्षार्थींची संख्या कमी होत राहिली आणि यामुळे अखेरकार सरकारने पुन्हा एकदा ही परीक्षा चौथी आणि सातवीच्या वर्गांसाठीच घेण्याचा निर्णय घेतला आहे. या परीक्षेत बसणाऱ्या बिगर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दोनशे रुपयांची एक्झाम फी भरावी.

तसेच अनुसूचित जाती-जमाती आणि दिव्यांगांना 125 रुपये एक्झाम फी भरावी लागते. दरम्यान सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या या शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आणखी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. सरकारने या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

नव्या निर्णयानुसार आता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना वार्षिक 5000 रुपये आणि 7 वी च्या विद्यार्थ्यांना वार्षिक 7500 शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. थोडक्यात सातवीच्या विद्यार्थ्यांना दरमहा 750 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. दोन्ही शिष्यवृत्तीचा कालावधी हा प्रत्येकी तीन वर्षांचा राहणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News