Maharashtra Schools : महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जर तुमच्याही कुटुंबात कोणी पहिली ते दहावीच्या वर्गात शिकत असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची राहणार आहे.
खरंतर गेल्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी लागली आहे. सध्या विद्यार्थी त्यांच्या पालकांसमवेत उन्हाळी सुट्टीचा आनंद घेत आहेत. काही विद्यार्थी आपल्या मामाच्या गावी सुट्ट्या एन्जॉय करत आहेत.

खरेतर, शैक्षणिक वर्ष 2024 25 मध्ये शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या फारच उशिराने लागल्यात. मात्र असे असले तरी नवीन शैक्षणिक वर्ष दरवर्षी ज्या वेळेला सुरू होते त्याच वेळेला सुरू होणार आहे.
यंदाही नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 – 26 ची सुरुवात 15 जून 2025 पासून होईल आणि 16 जून 2025 पासून नियमित शाळा भरतील अशी माहिती समोर येत आहे. मात्र विदर्भातील शाळा थोड्याशा उशिराने भरणार आहेत आणि
सुरुवातीच्या टप्प्यात विदर्भातील शाळा फक्त सकाळ सत्रात भरतील आणि थोडेसे तापमान कंट्रोल मध्ये आले की मग त्यानंतर विदर्भातील शाळा नियमित वेळेप्रमाणे भरणार आहेत. अशी सारी परिस्थिती असताना नवीन शैक्षणिक वर्षात शाळांच्या वेळापत्रकात बदल झाला असल्याचे वृत्त हाती आले आहे.
शाळेच्या वेळापत्रकात बदल होण्याचे कारण?
खरे तर, नवीन शैक्षणिक वर्षात म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2025 – 26 मध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू केले जाणार आहे. हे नवीन शैक्षणिक धोरण लागू झाले की शाळांच्या वेळापत्रकात सुद्धा बदल होणार आहे आणि आज आपण नव्या शैक्षणिक धोरणानुसार शाळेच्या वेळापत्रकात नेमका कोणता बदल होणार याच बाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस असणार शाळेचे नवीन वेळापत्रक ?
मिळालेल्या माहितीनुसार, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पुढील वर्षी शाळा नऊ वाजेला भरतील आणि चार वाजेला सोडल्या जाणार आहेत. म्हणजेच शाळेची वेळ आता नऊ ते चार अशी होणार आहे.
याची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून होणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार, राज्यातील सर्वच शाळा आता सकाळी 9:00 वाजता भरतील, त्यानंतर 9:25 पर्यंत परिपाठ होईल, परिपाठ झाल्यानंतर मग अकरा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत पहिल्या तीन तासिका होणार आहेत.
त्यानंतर, मग दहा मिनिटांची लहान सुट्टी राहणार आहे. लहान सुट्टी झाली की 11:35 वाजेला शाळा भरेल आणि त्यानंतर 12:50 पर्यंत दोन तासिका होतील. यानंतर मग जवळपास 40 मिनिटांची मोठी सुट्टी राहणार आहे. मोठी सुट्टी झाली की मग दीड पासून पुन्हा शाळा भरेल आणि 3:55 पर्यंत तासिका होतील. दरम्यान शेवटच्या पाच मिनिटांमध्ये वंदे मातरम घेतले जाईल आणि त्यानंतर मग शाळा सोडली जाईल.