Maharashtra Schools : राज्यातील दहावी आणि बारावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर विद्यार्थी आता अंतिम परीक्षेची तयारी करत आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा होणार आहे आणि अनुषंगाने विद्यार्थ्यांकडून जोरदार तयारी सुरू आहे.
कशातच आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अर्थातच सीबीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मंडळाकडून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षा संदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या मार्गदर्शक सूचनानुसार विद्यार्थ्यांना आता 75 टक्के उपस्थिती लावावी लागणार आहे. जर विद्यार्थ्यांनी 75 टक्के उपस्थिती राखली नाही तर त्यांना बोर्ड परीक्षेला मुकावे लागणार आहे. जे विद्यार्थी हा छोटासा नियम पाहणार नाही त्यांना परीक्षा देता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
विद्यार्थ्यांनी 75 टक्के उपस्थिती राखली नाही तर ते बोर्ड परीक्षेत बसण्यास अपात्र ठरतील. यामुळे विद्यार्थ्यांनी शाळेत हजर राहणे आवश्यक आहे. CBSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांनी विनाकारण गैरहजर राहू नये असे पण आवाहन तज्ञांकडून करण्यात आले आहे.
तसेच विषय निवडीबाबतही सीबीएसई बोर्डाने काही महत्वाच्या मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. सीबीएसई बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना आता पाच अनिवार्य विषयांबरोबर दोन अतिरिक्त विषय घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
तसेच बारावीच्या विद्यार्थ्यांना मात्र एकच अतिरिक्त विषय निवडता येणार आहे. पण शाळेला त्या विषयासाठी बोर्डाची परवानगी असणे गरजेचे आहे. तसेच शिक्षक, प्रयोगशाळा अशा आवश्यक सुविधा पण अनिवार्य आहेत.
अर्थात जर बोर्डाची परवानगी नसेल आणि आवश्यक सुविधा नसतील तर विद्यार्थ्यांना तो विषय मुख्य किंवा अतिरिक्त स्वरूपात घेता येणार नाही. बोर्डाने आपल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये ही बाब सांगितली आहे.
थोडक्यात आता शाळेत नियमित हजर असणाऱ्या विद्यार्थ्यांनाच बोर्डाची परीक्षा देता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. गरज नसेल तर गैरहजर राहणे टाळावे असा सल्ला दिला जातोय.
शिक्षण प्रक्रियेची गुणवत्ता कायम राहावी यासाठी सीबीएसई बोर्डाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे बोर्डातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता सुधारणार आहे.